India Fights Back : देशात कोरोनाचे नवे रूप समोर येत असताना सरकार या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारने आता दररोज 45 लाख चाचण्या करण्याची तयारी सुरू केली आहे. India Fights Back Now 45 Lakh Corona Test Daily, 17 New Lab Will be Established For Identifying New Variants Of Covid 19
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे नवे रूप समोर येत असताना सरकार या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारने आता दररोज 45 लाख चाचण्या करण्याची तयारी सुरू केली आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट आता थोडी कमी झालेली दिसत असली तरी तज्ज्ञांनी तिसर्या लाटेबाबत आधीच इशारा दिला आहे. हे पाहता आता कोरोनाशी सामोरे जाण्याच्या तयारीला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनामुळे देशातील परिस्थिती लक्षात घेता एक उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्यात ते म्हणाले की भारतीय सार्स कोव्ह-2 जीनोमिक्स कन्सोर्शियमच्या नेटवर्कमध्ये 17 लॅब उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की सध्या देशात केवळ 10 लॅब आहेत. 17 नवीन लॅब उघडण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कोरोनाच्या नवीन रूपांचे परीक्षण करणे आहे.
बैठकीस उपस्थित आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, सध्या देशात दररोज सुमारे 25 लाख चाचण्या घेतल्या जातात. त्यापैकी 13 लाख आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या जात आहेत, तर त्यानंतर 12 लाख अँटीजन चाचण्या घेण्यात येत आहेत. ते म्हणाले की, चाचणी क्षमता वाढवून ती आता दररोज 45 लाख करण्याचा भर दिला जात आहे. ज्यामध्ये 18 लाख आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात येणार असून 27 अँटिजन चाचण्या घेण्यात येतील.
India Fights Back Now 45 Lakh Corona Test Daily, 17 New Lab Will be Established For Identifying New Variants Of Covid 19
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App