भारत कोरोनापेक्षा “गिधाडी पत्रकारितेचा” बळी ठरतोय; ऑस्ट्रेलियन मीडियाने पाडले पितळ उघडे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात कोरोना फैलाव जितक्या वेगाने होतोय तेवढेच युध्दपातळीवर प्रयत्न करून त्याला रोखण्याचे उपाय केंद्र सरकार करताना दिसते आहे. केंद्राने यासाठी बरेच धोरणात्मक मूलभूत बदल केले असल्याचे स्पष्ट होत आहे. या धोरणातूनच येत्या ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत कोरोना प्रतिबंधक लसींच्या २१६ कोटी डोसच्या उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ही लस सर्व भारतीयांसाठी उपलब्ध असेल. india facing covid 19 and vulture journalism as well, say australia today

असे असताना भारत लिबरल्स आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अँटी इंडिया प्रोपोगांडाचा आणि गिधाडी पत्रकारितेचा बळी ठरतानाही दिसतो आहे. ऑस्ट्रेलिया टुडेने याबाबतची वस्तुस्थिती सांगणारा रिपोर्ट प्रसिध्द केला आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया अगदी न्यूयॉर्क पोस्ट किंवा सीएनएनसारखे माध्यमही या अँटी इंडिया अजेंड्यापासून दूर नाही, याची उदाहरणासहित यादी ऑस्ट्रेलिया टुडेच्या रिपोर्टमध्ये दिली आहे.

ब्रिटिश – अमेरिकन कंपनी getty images स्मशानभूमींचे फोटो सर्रास प्रत्येकी २३००० रूपयांना विकत आहे. कंपनीच्या कुठल्याही भारतीय किंवा परकीय फोटोग्राफरने टिपलेला भारतातला स्मशानात चिता जळत असलेला फोटो वर उल्लेख केलेल्या किमतीला विकला जातोय. हे फोटो आंतरराष्ट्रीय मीडिया वापरतो आहे.


कोविड सेंटरला पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या पिंपरीतील पत्रकारावर गुन्हा दाखल


न्यूयॉर्क पोस्टने तर भारतात रस्त्यावर ऑक्सिजनअभावी माणसे मरतात हा रिपोर्ट छापताना मे २०२० चा रस्त्यावर एक व्यक्ती बेशुध्द पडल्याचा फोटो बिनदिक्कतपणे वापरला आहे. यात त्यांनी वस्तुस्थिती जराही विचारात न घेता रिपोर्ट दडपून दिला आहे. आंध्रात गॅस लिकने ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातला एक फोटो स्काय न्यूजने ७ मे २०२० रोजी वापरला होता. तोच फोटो न्यूयॉर्क पोस्टने २६ एप्रिल २०२१ च्या अंकात भारतात कोविड पेशंट रस्त्यावर मरताहेत या बातमीत छापला आहे.

भारतातली लिबरल पत्रकार बरखा दत्त हिच्या वडिलांचे कोविडने दुर्दैवी निधन झाले. त्या घटनेचे वर्णन सीएनएन वाहिनीवर बरखा असे केले की जणू काही तिच्या वडिलांचे निधन उपचारांअभावी झाले आहे. माझा श्वास घुसमटतोय. माझ्यावर उपचार करा, हे माझ्या वडिलांचे अखेरचे शब्द होते, असे बरखाने सीएनएनला सांगितले.

प्रत्यक्षात बरखाचे वडील दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत होते. त्या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ही वस्तुस्थिती बरखाने सांगितली नाही.

बरखा १९ एप्रिलला सुरतच्या स्मशानभूमीतून रिपोर्टिंग करीत असल्याचे तिनेच ट्विट करून सांगितले होते. तिने जमीनीवर बसून एका बादलीवर एक फळी ठेवून तिच्या लॅपटॉपचा माऊस ठेवण्यासाठी कार्डबोर्ड तयार केला होता. ती तेथून रिपोर्टिंग करीत होती. मग त्याच दरम्यान निधन झालेल्या वडिलांचे अखेरचे उद्गार ऐकायला ती मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये गेली होती का, याचा खुलासा तिने केलेला नाही. बरखाचा हे दुटप्पी वर्तन उघडे पाडल्यावर तिने ट्विट करून ऑस्ट्रेलियन मीडियावर आगपाखड करणारे ट्विट देखील केले होते.

भारतात कोरोनाचा कहर असताना आंतरराष्ट्रीय मीडिया किती बेजबाबदारपणे रिपोर्टिंग करतो आहे, त्याला भारतातल्या लिबरल्सची कशी साथ मिळते आहे, याची काही उदाहरणे ऑस्ट्रेलिया टुडेने दिली आहेत.

india facing covid 19 and vulture journalism as well, say australia today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात