विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी आता समाजवादी पक्षानेही ब्राह्मण समाजाला साद घातली आहे. परशुराम पीठाचे प्रमुख आणि माजी आमदार संतोष पांडे यांनी अशा बैठका घेण्याची इच्छा दर्शविली असून अखिलेश यांची अनुमती आहे, अशी माहिती सपचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दिली. In Uttar Pradesh, the Samajwadi Party has also started recommending Brahmins
ते म्हणाले, भाजप सरकारच्या राजवटीत ब्राह्मणांचा आणि इतरांचा छळ केला जात असल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप आहे. अत्याचाराचेही आरोप होत आहेत. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार आले तरच न्याय मिळेल याची जाणीव जनतेला झाली आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष माताप्रसाद पांडे, प्रबुद्ध सभेचे अध्यक्ष मनोज पांडे, सनातन पांडे यांच्यासह ब्राह्मण समाजातील वरिष्ठ नेते या संमेलनांसाठी पक्षाचे धोरण आखत आहेत. हे नेते राज्याच्या विविध भागात दौरे आणि परिषदांचे आयोजन करतील. त्याद्वारे आगामी निवडणुकीपूर्वी उच्च जातींमधील मतदारांशी संवाद साधण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App