महिलेला मारहाण केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या मंत्र्यावर खटला भरण्याचा आदेश


विशेष प्रतिनिधी

लखनौ – महिलेला मारहाणप्रकरणी उत्तर प्रदेशचे मंत्री आनंदस्वरुप शुक्ला यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. हे प्रकरण एप्रिल महिन्यातील आहे. Uttar Pradesh minister ordered to file case against woman for assault

पाच एप्रिल रोजी राणीदेवी आणि इतर काही महिला शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि इतर मदतीसाठी शुक्ला यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी शुक्ला यांना राग आला आणि त्यांच्या चिथावणीवरून सहकाऱ्यांनी महिलांना मारहाण केली. महिलांचे कपडे फाडून त्यांना अपमानित करण्यात आले. शुक्ला यांनी एका महिलेच्या डोक्यावर चप्पल फेकून मारल्याचा आरोपही आहे.



देवी यांनी शुक्ला, त्यांचा भाऊ आद्य, बलिया कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रमुख बालमुकुंद मिश्रा, शुक्ला यांचे २५ सहकारी आणि २५ पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोप केले आहेत. ही घटना घडली त्यादिवशी पोलिसांनी चार महिला आणि एका पुरुषाला मंत्र्याच्या कार्यालयात गोंधळ घातल्याबद्दल अटक केली होती.

Uttar Pradesh minister ordered to file case against woman for assault

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात