विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपाला मोठा झटका बसला आहे. या तिन्ही पक्षातील 21 मोठ्या नेत्यांनी पक्षाचा त्याग करत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. बरेलीचे मौलाना तौकीर रजा यांची सुन निदा खान यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर निदा खान म्हणाल्या की, मुस्लिम महिला भाजपसोबत आहेत.In Uttar Pradesh, Samajwadi Party, Congress and BSP suffered a major blow, 21 leaders joined BJP
इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदचे प्रमुख मौलाना तौकीर रजा खान यांची सुन निदा खान यांनी रविवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी लखनऊमध्ये जाऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. निदा खान तीन तलाक पीडित आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निदा खान म्हणाल्या की, मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कारण भाजपने देशात ट्रिपल तलाक कायदा आणला आहे आणि सर्व धर्माच्या महिलांसाठी सशक्तिकरणाचे काम देखील भाजप करत आहेत. निदा खान यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पाटीर्चे नेते शिवचरण प्रजापती, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत.
वादग्रस्त वक्तव्यावरुन नेहमी चर्चेत असलेले मौलाना तौकीर रजा यांची सुन निदा खानने म्हटले आहे की, तीन तलाक प्रकरणात भाजपने ज्या प्रकारचे काम केले आहे ते कौतुकास्पद आहे. माझे सासरे काहीही म्हणतील, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मुस्लिम महिला भाजपला नक्कीच पाठिंबा देतील. आजवर आपल्यावर अन्याय झाला आहे, आता आपला कोणावरही विश्वास नाही, फक्त भाजपवर आहे. त्या भाजपमध्ये प्रवेश करून न्यायासाठी लढणार आहे.
हजरत बरेली शरीफचे मौलाना तौकीर रझा खान अलीकडेच वादात सापडले आहेत. यापूर्वी त्यांनी बाटला हाऊस चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद म्हटले होते. त्यानंतर एका टीव्ही न्यूज अँकरला धमकी देण्यात आली. एवढेच नाही तर खुद्द त्यांची सून निदा यांनीही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
निदा खान यांचा विवाह आला हजरत कुटुंबातील मौलाना उस्मान रझा खान उर्फ अंजुम मियाँ यांचा मुलगा शीरान रझा खान यांच्याशी झाला होता. मौलाना उस्मान हे आयएमसी प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांचे मोठे भाऊ आहेत. वर्षभरातच निदा यांचा शीरनपासून घटस्फोट झाला. प्रकरण तिहेरी तलाकचे बनले, यासाठी निदा यांनी दीर्घ लढा दिला. त्यांचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे.
निदा खान म्हणाल्या की, जेव्हा ती घरची सून झाली आणि तिच्यावर अन्याय झाला तेव्हा तौकीर रझा यांनी आवाज उठवला नाही. त्या म्हणतात की, आता तौकीर रझा प्रियांका यांच्या ‘लडकी हूँ, लड शक्ती हूं’ या घोषणेचे समर्थन करतात. निदा खान यांनी आपल्या घरातील महिलांना त्रास दिल्याचे सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App