उत्तर प्रदेशात ७ मार्चपर्यंत एक्झिट पोलवर बंदी, उल्लंघन केल्यास खावी लागणार जेलची हवा

विशेष प्रतिनिधी

लखनऊ: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे रण तापले असताना व मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने एक्झिट पोलला बंदी घातली आहे. राज्यात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत एक्झिट पोल घेण्यावर आयोगाने बंदी घातली आहे.Exit polls banned in Uttar Pradesh till March 7

उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजयकुमार शुक्ला यांनी आज एक्झिट पोलबाबत घेतलेल्या निर्णयानुसार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजल्यापासून ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी राहीले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांसाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे.त्यामुळेच या काळात एक्झिट पोलवर बंदी घातली गेली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया वा अन्य कोणत्याही माध्यमांत या कालावधीदरम्यान कोणत्याही प्रकारचा एक्झिट पोल प्रसिद्ध वा प्रसारित करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. याबाबत नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते तसेच अशा प्रकरणात दोन वर्षांपर्यंत शिक्षेचीही तरतूद असल्याचेही सांगण्यात आले.

Exit polls banned in Uttar Pradesh till March 7

महत्त्वाच्या बातम्या