टीव्ही डिबेटमध्येच दे दणादण : सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास भिडले, प्रभु रामचंद्राचा केला होता अवमान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे रामचरितमानस संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. दरम्यान, एका टीव्ही डिबेटमध्ये ते सहभागी झाले असता तिथे राजू दास परमहंसदेखील उपस्थित होते, दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे पर्यावसन मारामारीत झाले.In TV Debate SP leader Swami Prasad Maurya and Raju Das clashed, Prabhu Ramchandra was insulted

वादादरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रभू रामचंद्राचा अपमान केल्याने राजू दास परमहंस संतापले होते. या कारणावरून चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार वाद सुरू झाला. काही वेळातच वातावरण जास्तच तापले आणि हाणामारीही झाली. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा राजू दास करत आहेत. यामुळे ते मौर्य यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.



दुसरीकडे, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पोलिस आयुक्तांना पत्रही लिहिले होते. स्वामी प्रसाद यांनी पत्रात म्हटले आहे की, हनुमानगढ़ी, अयोध्येचे महंत राजू दास आणि त्यांच्या समर्थकांनी ताज हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमातून बाहेर पडताना तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य?

काही दिवसांपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, कोट्यवधी लोक रामचरित मानस वाचत नाहीत, हा सगळा मूर्खपणा आहे. तुलसीदासांनी आपल्या आनंदासाठी हे लिहिले आहे.

स्वामी प्रसाद मौर्य एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, सरकारने याची दखल घेऊन रामचरित मानसमधील आक्षेपार्ह भाग वगळावा किंवा या संपूर्ण पुस्तकावर बंदी घालावी. त्यांनी असेही म्हटले होते की, ब्राह्मण हा भलेही लंपट, दुष्ट, अशिक्षित असू द्या, पण जर तो ब्राह्मण असेल तर तो पूज्य आहे असे म्हटले जाते. परंतु शूद्र कितीही विद्वान असला तरीही त्याला आदर नाही, हा धर्म आहे का?

या एका वक्तव्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या होत्या, भाजपनेही याला मोठा मुद्दा बनवला होता आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

In TV Debate SP leader Swami Prasad Maurya and Raju Das clashed, Prabhu Ramchandra was insulted

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात