दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपरसाठी 10 मिनिटे वाढीव वेळ


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला आहे.10 minutes extra time for examination papers for class 10th – 12th students

दहावी – बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी दिल्या जात होत्या. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये कॉपीच्या घटना समोर येत असल्याने 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने यावर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे ही 10 मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने आता पेपरच्या नंतर 10 मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यानुसार आता बोर्डाने परिपत्रक जारी करत निर्धारित वेळेनंतर परीक्षेदरम्यान १० मिनिटे वाढवून दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



दहावी – बारवी बोर्ड परीक्षांच्या वेळेत बदल

परीक्षेची सध्याची वेळ सकाळी ११.00 ते दुपारी २.00
परीक्षेची सुधारित वेळ सकाळी ११ ते २.१० वाजेपर्यंत

परीक्षेची सध्याची वेळ सकाळी ११.00 ते दुपारी १ वाजेपर्यंत
परीक्षेची सुधारित वेळ सकाळी ११.00 ते दुपारी १.१० वाजेपर्यंत

परीक्षेची सध्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
परीक्षेची सुधारित वेळ सकाळी ११.00 ते दुपारी १.४० वाजेपर्यंत

दुपारचे सत्र

परीक्षेची सध्याची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६.00 वाजेपर्यंत
सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६.१० वाजेपर्यंत

परीक्षेची सध्याची वेळी दुपारी 3.00 ते सायंकाळी ५.00 वाजेपर्यंत
सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ५.१० वाजेपर्यंत

परीक्षेची सध्याची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ५.४० वाजेपर्यंत

10 minutes extra time for examination papers for class 10th – 12th students

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात