वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुजरातमधील कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन संस्कृतीचे शहर असा नावलौकिक असलेले ढोलविरा हे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता ते जागतिक पर्यटनस्थळ बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. In the list of UNESCO World Heritage Sites Gujarat’s Hadappa era ‘Dholvira’ flashed
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सांस्कृतिक विभागाने याबाबतची घोषणा मंगळवारी केल्यामुळे भारतात आनंदाचे वातावरण पसरले आहे. युनोस्कोने ट्विटर हॅन्डलवर घोषणा केली आहे. त्यात म्हंटले की, ‘ ब्रेकिंग ढोलविराचा हे भारतातील हडप्पाकालीन शहर युनोस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत समावेश केला आहे. अभिनंदन ! ‘
केंद्रीय पर्यटनमंत्री जी. के. रेड्डी यांनी सांगितले की, या बातमीने मला अत्यानंद झाला. ढोलविरा हे भारतातील एकेकाळी महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. आपल्या भूतकाळाशी या शहराचा सर्वात महत्वाचा संबंध आहे. विशेष म्हणजे इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रात रस असणार्यांना भेट देणे आवश्यक आहे. जागतिक वारसा स्थळांच्या सुपर -40 क्लबमध्ये ढोलविराचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे २०१४ पासून भारताने दहा नवीन जागतिक वारसास्थळांची भर घातली आहे,” असे ते म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मला ढोलविरातील वारसा संवर्धन आणि जीर्णोद्धाराशी संबंधित पैलूंवर काम करण्याची संधी मिळाली. या स्थळाच्या पर्यटनासाठी अनुकूल पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले होते.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App