पंजाबात काँग्रेसमध्ये; तर बंगालमध्ये भाजपमध्ये बंडाळी; बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिमेकडील राज्य पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडत बंडाळी माजली आहे, तर दुसरीकडे पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये बंद करून बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.In the Congress in Punjab; While in Bengal the BJP revolted; Babul Supriyo joins Trinamool Congress

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या वेळी बाबुल सुप्रियो यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. आज त्यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.



2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबुल सुप्रियो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगाल मधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बाबुल सुप्रियो यांना केंद्रात राज्यमंत्री पद दिले होते. त्यांना 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन भाजपने मैदानात उतरवले होते.

परंतु त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातून देखील त्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. ही चर्चा खरी ठरून बाबुल सुप्रियो यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

In the Congress in Punjab; While in Bengal the BJP revolted; Babul Supriyo joins Trinamool Congress

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात