अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणात युवक कॉँग्रेसच्या नेत्यांनी १०० हून अधिक मुलींना ब्लॅकमेल करून केला होता बलात्कार

विशेष प्रतिनिधी

अजमेर : अजमेर शरीफ दर्ग्याचे संरक्षक असलेल्या खादिम कुटुंबातील तरुण हे त्या काळात स्थानिक सेलीब्रिटींप्रमाणे वागत. त्या काळात अप्रूप असलेल्या उघड्या जीप, अ‍ॅम्बेसेडर आणि फियाट कारमधून फिरत. जीम करून तब्येत कमावलेले, गळ्यात सोन्याच्या साखळ्या आणि संजय दत्तप्रमाणे केस वाढविलेले हे तरुण युवक कॉँग्रेसचे आघाडीचे नेते होते. एका मुलीवर तर कॉँग्रेसमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने बलात्कार झाल होता.In the Ajmer gangrape case, more than 100 girls were blackmailed and raped by Youth Congress leaders

फारुख आणि नफीस हे दोघेही अजमेरमधील युवक काँग्रेसचे आघाडीचे नेते होते. प्रचंड पैसा आणि राजकीय ताकदीमुळे ते मस्तवाल झाले होते. शाळकरी मुली म्हणजे त्यांना आपली मालमत्ता वाटे. त्यावेळी क्राईम रिपोर्टर असलेल्या संतोष गुप्ता या पत्रकाराने सांगितले की मला एक प्रसंग आठवतो.दोघे जीप घेऊन एलिट नावाच्या हॉटेलवर गेले होते. तेथे काही शाळकरी मुली बसल्या होत्या. त्यांच्यापैकी एकाने रेस्टॉरंट मॅनेजरला फोन केला आणि त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने सर्वांना आईस्क्रीम वाटण्यास सांगितले. त्या मुलींवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी हे केले होते.

केवळ पैशाच्याच नव्हे तर राजकीय ताकदीवरही त्यांनी अनेक मुलींचे शोषण केले. यातील गीता नावाच्या तरुणीची कथा तर अंगावर शहारे आणणारी आहे. त्या काळात गॅस कनेक्शन ही मोठी गोष्ट असायची. त्याचबरोबर गीताला राजकारणात यायचे होते. बारावीत शिकणाºया गीताने यासाठी अजय नावाच्या ओळखीच्या तरुणाला याबाबत विचारले.

त्याने नफीस आणि फारुख चिश्ती यांच्याशी ओळख करून दिली. ते चांगले लोक आहेत. या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आपल्या मित्रांशीही संबंध ठेवण्यास बळजबरी केली. ऐवढेच नव्हे तर तिने आपल्या मैत्रीणीांनाही आपल्याकडे आणावे यासाठी तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. गीताने आपल्या साक्षीत सांगितले होते की,

त्यांनी तिला कॉँग्रेसमध्ये पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यासाठी फॉर्म भरायला दिला. तिचा फोटोही मागितला. एके दिवशी ती शाळेत जात असताना नफीस आणि फारूकने तिला त्यांच्या व्हॅनमध्ये अडवले आणि तिला लिफ्ट देऊ केली. ती विश्वासाने त्यांच्यासोबत गेली. पण तिला शाळेत नेण्याऐवजी एका फार्महाऊसवर आणले.

नफीसने तिच्यावर हल्ला करत बलात्कार केला. आपण सांगू तसे न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गीता अनेक मुलींना फार्महाऊसवर किंवा फारुख नावाच्या तरुणाच्या बंगल्यावर आणले. याठिकाणी मुलींवर सामूहिक बलात्कार केले जात. बलात्कार करतानाचे फोटोही काढत. त्यामुळे या मुलींना कायम ब्लॅकमेल करणे शक्य होई.

धक्कादायक म्हणजे गीता आणि तिच्याबरोबरच्या आणखी एक पीडित मुलगी कृष्णबाला यांनी या सगळ्या प्रकाराला कंटाळून एका पोलीस हवालदाराशी संपर्क साधला. त्यांनी अजमेर पोलिसांच्या विशेष शाखेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याशी त्यांची ओळख करून दिली.

त्यांनी ब्लॅकमेल केलेले फोटो परत मिळविण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले, परंतु लवकरच दोघींना धमकीचे कॉल आले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क का केला असे विचारले. एकदा कॉन्स्टेबलने तिला आणि कृष्णबालाला अजमेर शरीफ दर्गा परिसरातून त्यांचे फोटो परत करण्यासाठी म्हणून नेले. तेथे पोलीसांसमोरच या टोळीतील एकाने त्यांना धमकावले. असले खूप खेळ आम्ही पाहिले आहेत, असे सांगितले.

In the Ajmer gangrape case, more than 100 girls were blackmailed and raped by Youth Congress leaders

महत्त्वाच्या बातम्या