Punjab Three terrorists arrested : पंजाबमधील तरण तारणच्या पोलिसांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळील भगवानपुरा गावातून 3 दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या ताब्यातून एक हातबॉम्ब, 11 काडतुसे आणि विदेशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेले तिघे पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कुलविंदरसिंग, कमलप्रीत सिंग मान, कंवर पाल सिंह अशी त्यांची नावे आहेत. in Punjab Three terrorists arrested near India Pakistan border, hand grenades, 11 cartridges pistol recovered
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमधील तरण तारणच्या पोलिसांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळील भगवानपुरा गावातून 3 दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या ताब्यातून एक हातबॉम्ब, 11 काडतुसे आणि विदेशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेले तिघे पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कुलविंदरसिंग, कमलप्रीत सिंग मान, कंवर पाल सिंह अशी त्यांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही तरुणांचे परदेशातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे मानले जात आहे. मात्र, सध्या पोलीस बारकाईने तपास करत आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीमही सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांना शस्त्रे आणि स्फोटके कोठून मिळाली याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरन तारण पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी खुलासा करू शकतात.
तरन तारणमध्ये यापूर्वीही असाच एक प्रकार समोर आल्याची माहिती आहे. अलीकडेच, अमृतसर पोलिसांनी भारत-पाक सीमेवर असलेल्या तरण तारणच्या डल्ला गावातून चार पिस्तूल, तीन मॅगझिन्स आणि 2 किलो हेरॉईन जप्त केली होती. बीएसएफसोबत संयुक्त कारवाई करून पोलिसांनी बॉर्डर ऑब्झर्व्हिंग पोस्ट (बीओपी) धर्तीवर शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर पंजाब पोलीस जवळच्या गावातील त्या लोकांची ओळख पटवत आहे, ज्यांना ही शस्त्रे आणि हेरॉईनची खेप उचलण्यासाठी काटेरी तारांपर्यंत पोहोचावे लागले.
in Punjab Three terrorists arrested near India Pakistan border, hand grenades, 11 cartridges pistol recovered
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App