पंजाबमध्ये प्रशांत किशोर यांचा तोतया, कॉँग्रेस नेत्यांना फोन करून मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरोधात भडकाविणारे फोन, पोलीसांकडून गुन्हा दाखल


पंजाब कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक ट्विस्ट आला आहे. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या तोतयाने कॉँग्रेस नेत्यांना कॅ. अमरिंदर सिंग यांच्याविरोधात भडकाविणारे फोन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हाही दाखल केला आहे.In Punjab, Prashant Kishor’s impersonators incite, phone call to Congress leaders and provocative phone calls against Chief Minister Amarinder Singh, case filed by police


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाब कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक ट्विस्ट आला आहे. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या तोतयाने कॉँग्रेस नेत्यांना कॅ. अमरिंदर सिंग यांच्याविरोधात भडकाविणारे फोन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हाही दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंजाबमधील नेत्यांना प्रशांत किशोर यांच्या नावाने फोन येत होते. या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध वक्तव्य करावे, त्यांच्या नेतृत्वावर टीका करावी असे सांगितले जात होते. मुख्यमंत्र्यांविरोधात टीका केली, त्यांची बदनामी केली तर हा मामला आपण कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे नेऊ. कॅ. अमरिंदर सिंग यांची चौकशी करण्यासाठी त्यांना तयार करू, असेही प्रशांत किशोर नावाने बोलणारा हा तोतया सांगत होता.



२०१७ च्या विधानसभा निवडणुकांत प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे काम केले होते. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ साठी प्रशांत किशोर यांना अमरिंदरसिंग यांनी आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले होते. प्रशांत किशोर उमेदवारी वाटपात निर्णायक भूमिका निभावतील, असेही बोलले जात होते.

मात्र, कॅ. अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांची भूमिका केवळ सल्लागारापुरती मर्यादित आहे. त्यांना कार्यकारी अधिकार नाहीत, असे सांगून प्रशांत किशोर यांना जमीनीवर आणले होते. त्यामुळे प्रशांत किशोर पंजाबचे कॉँग्रेस पक्षाचे काम स्वीकारतील का याबाबत शंका व्यक्त होत आहे.

आता थेट प्रशांत किशोर यांच्याच नावाने फोन केल्यामुळे पंजाबमध्ये सुरू असलेल्या कॉँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीत त्यांची भूमिका आहे का? असा सवाल केला जात आहे. नवज्योत सिंग सिध्दू यांचा किशोर यांच्याकडून प्याद्याप्रमाणे वापर होत आहे का? असेही विचारले जात आहे. .

अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेदांमुळे पंजाबमधील कॉंग्रेस नेतृत्वात वाढत असलेल्या अडचणींमध्ये त्यामुळे आणखी वाढ झालीआहे. पंजाब कॉंग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी तीन सदस्यीय कॉंग्रेस पॅनल स्थापन करण्यात आले होते, ज्याने आपला अहवाल सोनिया गांधी यांना सादर केला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, हरीश रावत, जेपी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत चौकशी सुरू केली आहे.

In Punjab, Prashant Kishor’s impersonators incite, phone call to Congress leaders and provocative phone calls against Chief Minister Amarinder Singh, case filed by police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात