पंजाबमध्ये भाजपच्या सरचिटणीसाला आंदोलक शेतकऱ्यांनी घरात कोंडले; १२ तासांनी सुटका


वृत्तसंस्था

चंदीगड : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी चक्क भाजप नेत्याला त्यांच्या कुटुंबासह घरात ओलीस ठेवल्याची घटना घडली. न्यायालायाच्या आदेश आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तब्बल १२ तासांनंतर त्याची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. In Punjab, agitating farmers locked the BJP general secretary at home; Release after 12 hours

भूपेश अग्रवाल, असे भाजप नेत्याचे नाव असून ते भाजपचे सरचिटणीस आहेत. सुटकेनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या ओलीस ठेवण्याच्या कृत्याचा निषेध केला असून त्यांचे आंदोलन बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील काँग्रेस सरकारची शेतकऱ्यांना फूस असल्याने ते शेफारले आहेत, असेही ते म्हणाले.



राजधानी चंदीगडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या राजपुरा शहरात भाजप नेत्याला ओलीस ठेवण्याचा प्रकार रविवारी घडला. भारत विकास परिषदेच्या इमारतीत जिल्हा पातळीवरील बैठकीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते जमा झाले होते. तेथे शेतकरी आले आणि बैठक उधळून लावली.

त्यानंतर त्यांनी एका घरात बैठक घेण्याचे ठरविले. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांनी घरातच कोंडून ओलीस ठेवले. तसेच घराचा वीज आणि पाणीपुरवठा तोडला. यावेळी समुपदेशन करण्यासाठी आलेला कार्यकर्ता शांती स्वरूप यांचे कपडे आंदोलकांनी फाडले.

पोलिसांनी कसे बसे त्याला गर्दीतून बाहेर काढले. भाजप पदाधिकाऱ्यांनी सुटकेसाठी पंजाब आणि हरियाना न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अखेर या नेत्याची सुटका झाली.दरम्यान, शेतकरी नेते प्रेमसिंग भांगु म्हणाले, अग्रवाल यांनी प्रक्षोभक भाषा वापरली तसेच शेतकऱ्यांना शिव्या घातल्या. त्याच्या अंगरक्षकाने पिस्तूल रोखले. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी घराला वेढा घातला.

In Punjab, agitating farmers locked the BJP general secretary at home; Release after 12 hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात