विशेष प्रतिनिधी
बेळगाव : कर्नाटकात लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढविण्यात आल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी केली. सात जूनपर्यंत लॉकडाऊन लागू झाला आहे. खरे तर लॉकडाऊन 24 मे रोजी संपणार होता.पण, त्यापूर्वीच पुढील दोन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. In Karnataka Two Week Lockdown Is Declared
राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी याबाबतची घोषणा शुक्रवारी सायंकाळी केली. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून राज्यातील परिस्थिती आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी उपायावर चर्चा केली. तांत्रिक समितीने दोन आठवडे लॉकडाऊनची शिफारस केली होती.
लॉकडाऊनमध्ये पूर्वीचे नियम लागू आहेत. दररोज सकाळी सहा ते दहा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल.नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.बस वाहतूक देखील बंदच राहणार आहे.
लॉकडाऊनचे पालन काटेकोर व्हावे, यासाठी कोणालाही सकाळी 10 नंतर रस्त्यावर फिरता येणार नाही. नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस खात्याला सूचना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App