गोव्यात काँग्रेसने शिवसेनेला झिडकारले; संजय राऊत भाजपच्या “इतिहासात” रमले!!

प्रतिनिधी

मुंबई : गोव्यात खूप प्रयत्न करून देखील काँग्रेसने शिवसेनेची राजकीय डाळ शिजू दिली नाही अथवा राष्ट्रवादी काँग्रेसलाही जवळ केले नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका केली आहे. In Goa, Congress rebuked Shiv Sena; Sanjay Raut

काँग्रेस सध्या वेगळ्याच हवेत तरंगते आहे हरकत नाही आम्ही गोव्यात स्वतंत्रपणे लढू असे सांगत संजय राऊत यांनी एक प्रकारे काँग्रेसच्या स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वावर आगपाखड केली आहे. त्याच वेळी संजय राऊत हे भाजपच्या राजकीय आणि निवडणूक “इतिहासात” देखील रमलेले दिसत आहेत. राऊत म्हणाले की गोव्यात शिवसेना हळूहळू वाढते आहे.भाजप देखील एकेकाळी गोव्यात नव्हता. सुरुवातीला भाजप फक्त 12 – 13 जागांवर निवडणूक लपवायचा. त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त व्हायचे. पण भाजपने प्रयत्नपूर्वक गोव्यात संघटना वाढवली. लोकसभेच्या एका निवडणुकीत तर भाजपच्या 360 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते पण तरी देखील त्यांनी कष्ट केले आणि पक्ष वाढवला तसेच शिवसेनाही गोव्यात सध्या राजकीय दृष्ट्या संघटनात्मक पातळीवर कमी असली तरी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढते आहे.

आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न केला परंतु काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही हे सध्या वेगळ्याच हवेत तरंगत आहेत पण त्यांना खाली यावे लागेल अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर वाग्बाण सोडले आहेत. पण एकुणात काँग्रेसने राजकीय दृष्ट्या गोव्यात झिडकारल्याची खंत संजय राऊत यांच्या वक्तव्यातून झलकताना दिसत आहे.

In Goa, Congress rebuked Shiv Sena; Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या