विशेष प्रतिनिधी
शांघाय : कोरोनाचा उगम जेथून झाल त्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एका शहरात लॉकडाऊन लावण्याचीही वेळ आली आहे. चीनच्या चांगचुन या ९० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे.In China, the number of corona patients has risen again, with one city shutting down
कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचे जाळे पसरले. या भयंकर विषाणूमुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातच नव्या विषाणूमुळे डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.
चांगचुन शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूचे संपूर्ण जगभर जाळे पसरले होते.
कोरोनामुळे मोठ्या संख्येत लोकांनी प्राण गमावले. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App