वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगाल येथील भवानीपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. पहिल्या राऊंडमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याविरोधात ३६८० मतांनी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या फेरीत त्यांची आघाडी ३०० मतांनी कमी झाल्याचे दिसते. त्या दुसऱ्या फेरीत २३७७ मते घेऊन आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या एकूण २१ फेऱ्या होणार आहेत. In Bhawanipur in West Bengal by-election Mamata Banerjee leads in the second round with २३७७ votes
सार्वत्रिक निवडणुकीत नंदीग्राम विधानसभा मतदार संघात त्यांचा शुभेन्दू अधिकारी यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. पण, आमदार बनण्यासाठी त्यांना पोटनिवडणूक लढवावी लागली आहे. आज भवानीपुर मतदारसंघात मतमोजणी सुरु असून मतदानाच्या पहिल्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आहे.
ही निवडणूक ममतांसाठी महत्वाची आहे कारण त्या जिंकल्या तर मुख्यमंत्री बनणार आहेत. अर्थात भवानीपुर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जातो. त्या याच मतदार संघातून निवडून आल्या आहेत. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भवानीपूर मतदार संघ सोडून नंदीग्राम मध्ये निवडणूक लढवली होती. परंतु त्या पराभूत झाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App