प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची बहनागा स्टेशनजवळ धडक होऊन भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, देशातील हा पहिलाच मोठा रेल्वे अपघात नाही. याआधीही भारतात अनेक भीषण रेल्वे अपघात घडले आहेत. आज आपण 42 वर्षांपूर्वी झालेल्या बिहार रेल्वे अपघाताबद्दल जाणून घेणार आहोत, जो देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जातो.In 1981 there was also a terrible train accident, 9 coaches of the train sank in the river and 800 people lost their lives
दिवस होता 6 जून 1981. मानसी-सहरसा रेल्वे सेक्शनवरील बदला घाट-धामारा घाट स्थानकादरम्यान बागमती नदीवरील पुल क्रमांक-51 वर प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन कोसळली. या ट्रेनमध्ये एकूण 9 बोगी होत्या.
रेल्वेच्या 9 बोगी बागमती नदीत पडल्या. ही ट्रेन मानसीहून सहरसाकडे जात होती. या अपघातात 800 जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून 1981 रोजी मानसीपर्यंत ट्रेन सुरक्षितपणे पुढे जात होती. दुपारी 3 वाजता गाडी बदला घाटात पोहोचली. थोडा वेळ थांबून गाडी हळू हळू धामारा घाटाकडे निघाली.
हवामान खराब असताना ट्रेनने थोडेच अंतर कापले होते. जोरदार वादळानंतर पावसाला सुरुवात झाली. तोपर्यंत ट्रेन रेल्वेच्या 51 क्रमांकाच्या पुलाजवळ पोहोचली होती. ट्रेन आपल्या वेगात धावत असताना अचानक ट्रेनच्या चालकाने ब्रेक लावला, त्यानंतर पॅसेंजर ट्रेनच्या 9 बोगी पुलावरून बागमती नदीत पडल्या.
अनेक लोकांचे मृतदेह अनेक दिवस रेल्वेच्या बोगीत अडकलेले होते. अधिकृत आकडेवारीनुसार या अपघातातील मृतांची संख्या 300 होती. पण स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला होता. हा अपघात देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून स्मरणात आहे.
अपघातामागे अनेक सिद्धांत
या अपघातामागे अनेक सिद्धांत समोर आले. गाडी बागमती नदी ओलांडत असताना रुळावर गाई-म्हशींचा कळप समोर आला, त्यांना वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला.
त्याच वेळी, असेही म्हटले जाते की त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता, वादळदेखील होते, त्यामुळे लोकांनी ट्रेनच्या सर्व खिडक्या बंद केल्या होत्या आणि जोरदार वादळामुळे सर्व दाब ट्रेनवर पडला आणि बोगी नदीत पडल्या. मात्र, चालकाने ब्रेक का लावला याचे कारण आजतागायत समोर आलेले नाही.
जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात
हा देशातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात होता. जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 2004 मध्ये श्रीलंकेत झाला होता. जेव्हा ओशन क्वीन एक्सप्रेस त्सुनामीच्या जोरदार लाटांमध्ये सापडली होती. या अपघातात 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App