लसीकरणासाठी ५० अब्ज डॉलरचा आराखडा, सर्वांना लस देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा पुढाकार


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – जगभरातच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस जीवघेणा होत चालला असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ५० अब्ज डॉलरचा वैश्विघक लसीकरण आराखड्याचा प्रस्ताव मांडला. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून २०२१ च्या अखेरपर्यंत किमान चाळीस टक्के लोकसंख्येचे लसीकरण होणे अपेक्षित असून पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत साठ टक्क्यांपेक्षाही अधिक लोकांना लस मिळणे गरजेचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे.  IMF plan for vaccination



‘जी-२०’ देशांच्या आरोग्य संमेलनामध्ये बोलताना आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी ही माहिती दिली.‘‘ कोरोनाच्या संसर्गामुळे मोठे आरोग्य आणि आर्थिक संकट उभे राहिले असून यातून बाहेर पडण्यासाठी मजबूत आणि योग्य समन्वय साधून केलेले प्रयत्न गरजेचे आहेत. या प्रयत्नांना आर्थिक आधाराची जोड मिळणे गरजेचे आहे. लशींचा साठा असलेले श्रीमंत देश आणि आणि लशी नसणारे गरीब देश यांच्यातील दरी वाढत गेल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.’’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ज्या देशांना लशींचा पुरवठा मर्यादित आहे अशांसाठी देखील आपल्याला वेगळी तरतूद करावी लागेल. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ५० अब्ज डॉलर लागतील असे त्यांनी सांगितले.

IMF plan for vaccination

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात