योग्य खबरदारी न घेतल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, आयएमएचा इशारा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशभरातील कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपल्याला तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागू शकते.’’ असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे.IMA warns for third wave of corona

आतापर्यंतचे या विषाणूचे स्वरूप लक्षात घेतले तर तो सर्वाधिक वेगाने पसरणारा विषाणू असल्याचे दिसून आले आहे, असे ‘आयएमए’ने म्हटले आहे. ‘‘ देशाची अर्थव्यवस्था ही कोरोना संसर्गाच्या सावटातून सावरत असताना हा संसर्ग वाढला तर तिला मोठा फटका बसू शकतो.



आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर तिसरी मोठी लाट येऊ शकते.’’ असा इशाराही ‘आयएमए’कडून देण्यात आला आहे.बारा ते अठरा वर्षे वयादरम्यानच्या मुलांचे तातडीने लसीकरण व्हावे म्हणून केंद्राने वेगाने पावले उचलायला हवीत, अशी मागणीही ‘आयएमए’कडून करण्यात आली आहे.

आरोग्यक्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना तातडीने बूस्टर देण्याबाबत निर्णय घेतला जावा असेही या संघटनेने म्हटले आहे.भारत सरकारने जोखीम असणाऱ्या देशांच्या श्रेणीत आता घाना आणि टांझानिया या दोन देशांचा समावेश केला आहे. या दोन्ही देशांतून येणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. कोरोना चाचण्यांबरोबरच विलगीकरणाच्या नियमांचेही त्यांना काटेकोर पालन करणे अनिवार्य असेल.

IMA warns for third wave of corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात