विशेष प्रतिनिधी
कानपूर – आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा. नवीन पदवीधारकांनी येत्या २५ वर्षांत त्यांना हवा तसा भारत घडविण्यासाठी काम सुरू करावे. त्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हावे, आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.IIT students will choose challenges says Modiji
आयआयटी कानपूरच्या ५४ व्या पदवीप्रदान समारंभात बोलताना मोदी म्हणाले, की विद्यार्थ्यांना देशाच्या विकासाची सूत्रे हातील घ्यायची असून त्यासाठी आताच काम सुरू करायला हवे. देश अमाप संधींच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगत या संधींचा फायदा घ्या.
अनेकजण तुम्हाला सोयीसुविधांसाठी शॉर्टकट निवडण्याचा सल्ला देतील. मात्र, तुम्ही तो निवडू नये, असा माझा सल्ला आहे. आयुष्यात तुम्हाला हवी असो किंवा नको असली तरी आव्हाने असतातच. त्यामुळे, आव्हाने निवडा.
आव्हानांपासून पळ काढणाऱ्यांचा बळी जातो, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हायला हवे. संपूर्ण स्वातंत्र्याचा आत्मनिर्भर भारत हा गाभा आहे, जिथे आपण कोणावरही अवलंबून नसू.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App