IIT जम्मूने जानेवारी सत्रासाठी 11 विविध विषयांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी ऍडमिशन प्रोसेस सुरू


विशेष प्रतिनिधी

जम्मू : IIT जम्मूने जानेवारी सत्रासाठी 11 विविध विषयांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी ऍडमिशन प्रोसेस सुरू केली आहे. ह्या कोर्सेस साठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जैव विज्ञान आणि जैव अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, मानवता आणि सामाजिक विज्ञान, साहित्य अभियांत्रिकी, गणित , यांत्रिक अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र इत्यादी विषयातील पीएचडी आठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. IIT जम्मूच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे.

IIT Jammu starts admission process for PhD admission in 11 different subjects for January session

अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील इंजिनिअरिंग पदवी किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील संशोधनाद्वारे पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार तसेच चांगले शैक्षणिक रेकॉर्ड किंवा विज्ञानातील पदव्युत्तर पदवी असलेल्या आणि योग्य GATE स्कोअर / UGC/CSIR-JRF/GPAT / NBHM पीएचडी साठी अप्लाय करू शकतात.


IIT जोधपूर प्लेसमेंट 2021-22 : प्रतिवर्ष 24.38 लाख रु. अँव्हरेज पॅकेज


अर्ज केलेल्या उमेदवारांना 24-25 नोव्हेंबर रोजी निवड प्रक्रियेसाठी कॉल लेटर मिळण्याची शक्यता आहे.

24 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी IIT जम्मूच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले होते. 210 कोटी रुपये खर्चून हे कॅम्पस बांधण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासह वसतिगृह, व्यायामशाळा, इनडोअर गेम्स यासारख्या सर्व सुविधा आहेत.

IIT Jammu starts admission process for PhD admission in 11 different subjects for January session

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण