लसीकरणाने गती घेतली नाही तर… दुसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट विक्राळ असेल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेच्या तुलनेत भारताची लसीकरणाची गती अत्यंत मंद आहे. जर लसीकरणाचा वेग वाढला नाही तर देशातील दुसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट विक्राळ असेल असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने महत्त्वाचा इशारा दिला आहे. दररोज नवी कोरोना रुग्णांची संख्या सहालाखांचा टप्पा ओलांडू शकते.If vaccination doesn’t pick up speed … the third wave of corona will be more monstrous than the second

आॅक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट विक्राळ रुप धारण करु शकते, असा इशारा या समितीकडून देण्यात आला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचेही या समितीकडून सांगण्यात आले आहे. या समितीने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, आपला अहवाल सादर केला आहे.



या अहवालात असे म्हटले आहे की, लहान मुलांना ज्या प्रमाणात कोरोनाची लागण होऊ शकते, त्या प्रमाणात आपल्याकडे आत्ता पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवण्यात आलेला आहे.

तसेच या अहवालात सहव्याधी असलेल्या तसेच दिव्यांग असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचनाही करण्यात आली आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही कोरोनाची तिसरी लाट ही ऑक्टोबर अखेरपर्यंत येण्याची शक्यता असल्याचेही या समितीकडून सांगण्यात आले आहे.

अद्यापपर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली नाही, ह्या मुद्द्यावर अनेक तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यातून असे लक्षात आले आहे की, कोरोना विषाणूचा अतिगंभीर परिणाम लहान मुलांवर होणार नसला तरीही ह्या मुलांमुळे इतरांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ शकतो.

तसेच कोरोनाची तिसरी लाट ही इतर दोन लाटांपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल अशीही माहिती या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.लसीकरणाची गती वाढवून तिसऱ्या लाटेचा धोका कमी केला जाऊ शकतो. सध्या देशात केवळ 7.6 टक्के (10.4 कोटी) लोकांचे पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे.

If vaccination doesn’t pick up speed … the third wave of corona will be more monstrous than the second

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात