विशेष प्रतिनिधी
जयपूर : मुस्लिम लिगचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असे तर कदाचित फाळणी टळली असती असे मत ऑर्गनायझर मासिकाचे माजी संपादक शेषाद्री चारी यांनी व्यक्त केले. ते एक वर्षापेक्षा जास्त जगणार नव्हते हे ब्रिटिशांना माहित होते. परंतु, आपल्या नेत्यांनी त्याकडे दूर्लक्ष केले असे त्यांनी सांगितले.If Jinnah had been made the Prime Minister, partition could have been avoided, said Seshadri Chari
जयपूर येथे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांच्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना चारी म्हणाले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी जिना यांना पंतप्रधान केले असते. आपण सगळ्यांनी प्रार्थना केली असती की त्यांना दीर्घायुष्य मिळावे. पण ते जगले नसते.
ब्रिटिशांना हे माहित होते की जिना एक वर्षही जगणार नाहीत. कारण ते टीबीचे रुग्ण आहेत आणि मृत्यूशय्येवर आहेत हे बिटिशांना माहित होते. दुदैवाने तेव्हा आमच्या नेत्यांनी याचा विचार केला नाही. त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली गेली असती तर फाळणी टळली असती. त्यांच्यानंतर कोण पंतप्रधान झाले हा वेगळा मुद्दा होता. पण निदान फाळणी झाली नसती.
चारी म्हणाले, यामध्ये खूप किंतु- परंतु आहेत. परंतु, आम्ही आणखी दहा वर्षे स्वातंत्र्यासाठी लढायचे ठरवले असते तर वीर सावरकर आणि के. एम. मुन्शी यांनी पाहिल्याप्रमाणे या राष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते. कदाचित पाकिस्तान नसता.
उदय माहूरकर म्हणाले, वीर सावरकर यांचे व्यक्तीमत्व भारतरत्नच्याही पलीकडे आहे. त्यांना भारतरत्न मिळाले तर चांगलेच होईल. परंतु, मिळाले नाही तरी हरकत नाही. कारण सावरकर भारतरत्नच्याही पलीकडे आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाच्या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या सूचनेनुसार अंदमान तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटीशांकडे दयेची याचिका दाखल केली होती, असे सांगून वादाला तोंड फुटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App