भाजपने शिवसैनिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला तर ईंट का जवाब पत्थर से देंगे, अब्दुल सत्तार यांचा इशारा


 

शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भाजप-सेना युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे, युतीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो, कदाचित भाजपने जर शिवसैनिकांवर कुठे अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेकडूनही ईट का जवाब पत्थर से दिया जायेगा, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. If BJP tries to do injustice to Shiv Sainiks, why will they answer with bricks and stones, warns Abdul Sattar


प्रतिनिधी

जळगाव : शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भाजप-सेना युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे, युतीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो, कदाचित भाजपने जर शिवसैनिकांवर कुठे अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेकडूनही ईट का जवाब पत्थर से दिया जायेगा, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये, शब्द इकडं-तिकडं झाल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे, तर नाना पटोले यांनी आपण त्या उद्देशाने बोललो नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, यासंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयासह राज्य सरकारकडून योग्य ती कायदेशीर कारवाई होईल, पण आता कोरोनाची तिसरी लाट असल्याने भाजपने आंदोलने थांबवावीत अशी टीका सत्तार यांनी यावेळी भाजप वर केली

राज्यातील संभाव्य राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, युती करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, तो आमच्या पक्षप्रमुखांचा आहे. तो जे निर्णय घेतील, त्याप्रमाणे काम होईल. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करीबाबतही त्यांनी भाष्य केलं. आजच मी जिल्हाधिकाऱ्यांना वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याविषयी सांगितलं असल्याचंही ते म्हणाले.

If BJP tries to do injustice to Shiv Sainiks, why will they answer with bricks and stones, warns Abdul Sattar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात