दिल्लीच्या जामा मशिदीखाली हिंदू देवतांच्या मूर्ती; हिंदू महासभेचा दावा!!; न्यायालयात जाणार


प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील ज्ञानवापी मशिदीत काशी विश्वनाथाचे मूळ शिवलिंग आढळले. याचा निकाल लवकरच कोर्टात लागेल मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमि शाही ईदगाह परिसराच्या व्हिडीओग्राफी सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका मथुरा कोर्टात दाखल झाली आहे त्यापाठोपाठ दिल्लीतील जामा मशिदीबाबत एक नवा वाद उफाळून आला आहे. जामा मशिदीखाली धर्मांध मुगल शासक औरंगजेबाने हिंदू देवी-देवतांच्या असंख्य मूर्ती गाडल्याचा दावा हिंदू महासभेने आहे. Idols of Hindu deities under the Jama Masjid in Delhi

– हिंदू महासभेचा दावा

दिल्लीतील जामा मशिदीखाली मुघल बादशहा औरंगजेबाने त्यावेळी हिंदू देवी-देवतांच्या लाखो मूर्ती गाडल्याचे इतिहासात दाखले असून जामा मशिदीचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण तसेच आवश्यकता भासल्यास उत्खनन करून सर्वेक्षण करण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे. तशी याचिका हिंदू महासभा न्यायालयात दाखल करणार आहे. त्यामुळे एकीकडे ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरू असतानाच आता दिल्लीतील जामा मशिदीवरुनही वाद न्यायालयात पोहोचणार आहे.



– ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी ज्ञानवापी मशिदीतल्या वजूखान्यातले तलावाचे पाणी उपसून तिथे व्हिडीओग्राफी करण्यात आली. मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, हिंदू पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरू आहे.

Idols of Hindu deities under the Jama Masjid in Delhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात