MIG 21 Aircraft Crashes : भारतीय हवाई दलाचे मिग -21 विमान बाडमेरमध्ये कोसळले, पायलट सुरक्षित

iaf mig 21 bison aircraft crashed in barmer during training pilot safe

MIG 21 Aircraft Crashes : भारतीय हवाई दलाचे मिग -21 विमान राजस्थानच्या बाडमेरमध्ये कोसळले. लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, अपघातानंतर वैमानिकाने स्वतःला सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढले. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रशिक्षण उड्डाणावर होते. MIG 21 Aircraft Crashes in barmer during training pilot safe


वृत्तसंस्था

जयपूर : भारतीय हवाई दलाचे मिग -21 विमान राजस्थानच्या बाडमेरमध्ये कोसळले. लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, अपघातानंतर वैमानिकाने स्वतःला सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढले. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रशिक्षण उड्डाणावर होते. बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान भुरतिया गावाजवळ पडले. ते म्हणाले की, विमान अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

हवाई दलाने म्हटले आहे की, “मिग -21 बायसन विमान, जे आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास पश्चिम क्षेत्रामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते, उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले. वैमानिक सुखरूप बाहेर पडला. कारणे शोधण्याचे कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

MIG 21 Aircraft Crashes in barmer during training pilot safe

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात