वृत्तसंस्था
चंडीगड – पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांचा भव्य समारंभात क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होत आहे. त्याच वेळी काँग्रेसमध्ये पराभवाचे घमासान आणखी वाढले आहे.I was not invited at swering in ceremony of charanjeet singh channi, but bhagwant maan invited me, says congress mp manish tiwari
काँग्रेसचे नेते आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी यांच्या ट्विटने काँग्रेसमधल्या भांडणाच्या आगीत तेल ओतले आहे. मला चरणजित चन्नी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला निमंत्रण नव्हते. पण भगवंत मान यांनी शपरथविधी निमंत्रण दिले आहे. मी त्यांचे आभार मानतो. सध्या संसदेच्या अधिवेशनात व्यग्र असल्याने मी शपथविधीला हजर राहू शकत नाही, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. भगवंत मान यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा, असे ट्विट मनीष तिवारी यांनी केले आहे.
I congratulate @BhagwantMann on being sworn in as Chief MinisterI thank him for inviting me to his swearing in . Due to Parliament being in session I will not be able to make it .It is ironic I was not invited to @CHARANJITCHANNI ‘s swearing in though he was one of my MLA’s pic.twitter.com/AyW91uNyYE — Manish Tewari (@ManishTewari) March 16, 2022
I congratulate @BhagwantMann on being sworn in as Chief MinisterI thank him for inviting me to his swearing in . Due to Parliament being in session I will not be able to make it .It is ironic I was not invited to @CHARANJITCHANNI ‘s swearing in though he was one of my MLA’s pic.twitter.com/AyW91uNyYE
— Manish Tewari (@ManishTewari) March 16, 2022
आधीच पंजाब काँग्रेसमध्ये पराभवानंतर राजकीय घमासान माजले आहे. कोणताच नेता कोणाचे नियंत्रण मानायला तयार नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांचा राजीनामा घेतला आहे. त्यातच आता मनीष तिवारींच्या ट्विटने काँग्रसमधल्या भांडणाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
-सोनिया – पंजाब खासदार भेट
सोनिया गांधी आज दुपारी १२.३० वाजता पंजाबमधल्या काँग्रेस खासदारांना भेटल्या आहेत. त्यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी खासदार हरजित कौर गैरहजर आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App