बंगाली वाघिणीचा भाचा घेतोय दिल्लीत ED शी टक्कर; “राष्ट्रवादी बाणा” मात्र झालाय रफूचक्कर…!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – मुंबई – सक्तवसुली संचालनालय ED नोटिशीवरून बंगाल आणि महाराष्ट्र यांच्यातला मोठा राजकीय भेद समोर आला आहे. बंगालच्या वाघिणीने दिल्लीशी यशस्वी राजकीय टक्कर तर घेतलीच, पण आता या वाघिणीचा भाचा देखील दिल्लीत जाऊन ED शी टक्कर घेतोय आणि महाराष्ट्रातले “महाराष्ट्र बाणा, राष्ट्रवादी पुन्हा” म्हणणाऱ्यांचे शिष्योत्तम मात्र ED ला सामोरे जाण्याऐवजी महाराष्ट्रातून रफूचक्कर झाले आहेत.I am ready to face any investigation. Investigation agency is doing their jobsays TMC General Secretary Abhishek Banerjee in Delhi, but where is anil deshmukh

या मुद्द्यावरून सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगली असून नुसतं महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही असे ब्रीदवाक्य ट्विटर अकाउंटवर लिहून दिल्लीशी टक्कर घेता येत नाही, तर प्रत्यक्षात दिल्ली समोर ठामपणे उभे राहून टक्कर द्यावी लागते, असे अनेक नेटिझन्सनी सुनावून घेतले आहे.कोळसा घोटाळा प्रकरणात आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्लीत जाऊन ईडी कार्यालयात हजर राहून अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.

शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख मात्र ईडीच्या एकापाठोपाठ एक अशा सहा नोटीसा येऊनही चौकशी आणि तपासाला सामोरे गेलेच नाहीत आणि आता तर ईडीला त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस काढण्याची वेळ आली आहे.

अशा स्थितीत नेटिझन्सनी त्यांची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली आहे. हा कसला महाराष्ट्र बाणा…?? म्हणे, राष्ट्रवादी पुन्हा…!! असे सवाल खडे केले आहेत. अनेक नेटिझन्सनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील कोसले आहे.

पवार साहेब हे ईडीने न दिलेल्या नोटिशीला प्रत्युत्तर द्यायला ईडीच्या कार्यालयात जाणार होते, पण किडीची प्रत्यक्ष नोटीस येऊनही त्यांनी नेमलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात का जात नाहीत… त्यांची तेवढी हिंमत का नाही…??, असा सवाल खडा करताना दिसत आहेत.

तृणमूळ काँग्रेसचे बंगालमधले खासदार अभिषेक बॅनर्जी आणि राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांची अनेक नेटिझन्सनी तुलना देखील केली आहे. अनेकांनी कर नाही त्याला डर कशाला ही मराठी म्हण वापरून देशमुखांचा रफूचक्कर होण्यामागे काही तरी काळंबेरं असले पाहिजे, अशी शंकाही व्यक्त केली आहे.

I am ready to face any investigation. Investigation agency is doing their jobsays TMC General Secretary Abhishek Banerjee in Delhi, but where is anil deshmukh

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण