विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लॉंचपॅडवरील हालचालींवर लष्कराचे लक्ष असून तेथे दहशतवाद्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. लॉंचपॅडवर तब्बल १४० दहशतवादी सक्रिय असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिली. Hundred of terrorist ready to enter in J and K
जम्मू काश्मीरमधून ३७० कलम वगळण्याच्या निर्णयास दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यातील स्थितीबाबत बोलताना अधिकारी म्हणाले, की या निर्णयानंतर परदेशातील दहशतवादी अचानक गायब झाले आहे. एक तर ते गर्दीच्या ठिकाणी राहत असतील किंवा पर्वतरांगात लपून बसले असावेत. दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. परंतु घुसखोरी रोखण्यासाठी लष्कर सजग असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र जवानांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App