बारावीची परीक्षा रद्द करण्याची देशभरातून मागणी, केंद्रीय शिक्षणमंत्री सर्व राज्यांशी आज बोलणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर कमी झाला नसल्याने आता देशभरातून बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. या पाश्वनभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक सोमवारी सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.HSC exam may be cancelled

या बैठकीकडे साऱ्या शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. कारण अनेक परीक्षांबाबत तसेच पुढील वर्षी शिक्षण कसे द्यायचे याबाबत या बैठकीत मूलभूत चर्चा होणार आहे.



कदाचित या बैठकीतच बारावीच्या परीक्षेबाबत काही महत्वाचा निर्णयदेखील होवू शकतो. देशभरातील बारावीचे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे परीक्षाबाबत नेमके काय होणार याकडे बारीक लक्ष लागलेले आहे.

कोरोनाचा शिक्षण व्यवस्थेवरील परिणाम हा चर्चेचा मुख्य विषय असेल. तसेच ऑनलाइन शिक्षण आणि नवी शैक्षणिक धोरण यावर ते सचिवांबरोबर चर्चा करणार आहेत.

मे महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा या मंत्रालयाने पुढे ढकलल्या आहेत. त्याबरोबरच बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या की ऑफलाइन यावरही चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

HSC exam may be cancelled

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात