कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तींनी बड्या घोटाळ्यातील आरोपीच्या वकीलाची भेट घेतलीच कशी, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा ममता बॅनर्जींना सवाल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: न्यायमूर्तींचा एखाद्या खटल्यात दुरान्वयानेही संबंध लागत असेल तर ते ‘माझ्यासमोर नको’ असे सांगून खटला दुसऱ्याकडे देण्यास सांगतात. मात्र, पश्चिम बंगालमधील एका बड्या घोटाळ्यातील आरोपीच्या वकीलांची कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी भेट घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यावर खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.How the judges of the Kolkata High Court met the lawyer of the accused in the big scam, West Bengal Leader of Opposition Suvendu Adhikari questions Mamata Banerjee,

भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी एका मोठ्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या वकिलाला भेटल्याचा आरोप करत स्पष्टीकरण मागितले.



अधिकारी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून म्डटले आहे की, दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी उच्च न्यायालयापुढे प्रलंबित असलेल्या प्रमुख घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या वरिष्ठ वकिलांची भेट घेतली. हे चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांकडून यावर तातडीने स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. लोकशाही टिकवायची असेल तर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य टिकवायला हवे.

भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रभारी अमित मालवीय यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले, पश्चिम बंगालचे राज्यसभेचे खासदार, मतदानानंतरच्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये पश्चिम बंगालचे वकील असणारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे की त्यांचे वरिष्ठ वकील एका बड्या घोटाळ्यातील आरोपीचा बचाव करत आहेत. विद्यमान न्यायाधिशांनी त्यांची भेट घेण्याचे कारणच काय?

अधिकारी आणि मालविय या दोघांनीही बड्या घोटाळ्यातील आरोपीचे नाव उघड केले नाही. मात्र, हा आरोपी जनावरांची तस्करी करणारा तसेच बेकायदेशिर कोळसा खाण घोटाळ्यातील मुख्य आरोपी विनय मिश्रा असल्याची चर्चा आहे. ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिजित बॅनर्जी यांचे नावही कोळसा घोटाळ्यात जोडले जात आहे.

मिश्रा याने 19 डिसेंबर 2020 रोजी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. वानुआतू नावाच्या पॅसिफिक देशाचे नागरिकत्व त्याने घेतल्याची चर्चा आहे.त्याचा भाऊ विकास मिश्राला मार्च 2021 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.

How the judges of the Kolkata High Court met the lawyer of the accused in the big scam, West Bengal Leader of Opposition Suvendu Adhikari questions Mamata Banerjee,

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात