ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके…! तिहेरी तलाक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणाऱ्या सहारनपूरच्या अतिया साबरी यांचा मोठा विजय; मिळणार पोटगी!


  • त्या पाच महिला काशीपूर (उत्तराखंड)च्या शायराबानो, जयपूर (राजस्थान)च्या आफरिन रेहमान, सहारनपूर (उत्तर प्रदेश)च्या आतिया साबरी, गाझियाबाद (दिल्ली)च्या गुलशन आणि हावडा (प. बंगाल)च्या इशरत जहाँ या पाच महिलांनी तिहेरी तलाकविरोधात लढा दिला. केंद्र सरकारला त्याविषयी कायदा करायला भाग पाडलं. 

  • तिहेरी तलाकचा खटला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात नेणार्या सहारनपूरच्या आतिया साबरीला पुन्हा विजय मिळविला आहे. पोटगी देण्याचा निर्णय फॅमिली कोर्टाने सुनावला. अर्जाच्या तारखेपासून 21 हजार रुपये दरमहा मिळणार.

विशेष प्रतिनिधी

सहारनपूर : तिहेरी तलाकचा खटला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात नेणार्या सहारनपूरच्या आतिया साबरीने पोटगी प्रकरणात पुन्हा विजय मिळविला आहे. कौटुंबिक कोर्टाचे मुख्य न्यायाधीश नरेंद्र कुमार यांनी आतियाला अर्जाच्या तारखेपासून आतापर्यंत 13 लाख 44 हजार रुपयांसह  21 हजार रुपये दर महिन्याला पोटगी  म्हणून देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.

आतिया आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींचा यात वाटा असेल.How did this courage subside, how did this desire stop …! Saharanpur’s Atiya Sabri wins triple divorce case, gets alimony !

 

आतिया साबरी यांनी 24 नोव्हेंबर 2015 रोजी पती वाजिद अलीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यात असे म्हटले होते की 25 मार्च 2012 रोजी तिचे लग्न वाजिद अलीशी झाले होते. लग्नात तीच्या कुटुंबाने कार, दागिने, घरगुती वस्तूंवर 25 लाख रुपये खर्च केला पण सासरच्यांनी असे असूनही 20 लाखांची आणखी  मागणी केली.

जेव्हा मागणी पूर्ण केली गेली नाही, तेव्हा त्यांनी आतियाला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, पण ती तेथून पळून गेली आणि आपल्या माहेरी परत आली.

नोव्हेंबर 2015 मध्ये  नवर्याने त्यांना तीन तलाक दिला .आतियाने या विरोधात कोर्टात आवाज उठविला. आतिया या उर्दू आणि समाजशास्त्र विषयात एमए आहेत.
त्यांनी पतीविरोधात कोर्टात पोटगीचा खटला दाखल केला. त्यांच्या नवर्याचे उत्पन्न दरमहा एक लाख होते असे सांगून आतिया म्हणाल्या की वाजिदच्या नावावर हिरो होंडा मोटरसायकलची एक डीलरशिप आणि 100 एकर शेतजमीन आहे.

आतियाने 25 हजार आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींसाठी, सादिया आणि सना, दरमहा 10-10 हजार देखभाल भत्ता म्हणून मागितले.

22 मार्च रोजी सरन्यायाधीश नरेंद्र कुमार यांनी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि कागदावरील पुराव्यांवरील सुनावणीच्या आधारे हा निकाल सुनावला. आतिया व त्यांच्या मुली सादिया व सना यांना देखभाल भत्ता म्हणून 7-7 हजारांची रक्कम निश्चित केली.

आतिया यांना अर्ज सादर करण्याच्या तारखेपासून देखभालीचे पैसे दिले जातील, असे कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले .अशा प्रकारे आतियाला दरमहा 21000 पोटगी आणि अर्जाच्या तारखेपासून 5 वर्ष 4 महिन्याचे एकरकमी 13 लाख 44 हजार रूपये देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

संघर्ष करा अन्यायाविरूद्ध आवाज उठवा : आतिया

अतिया म्हणतात की ही लढाई लढणे सोपे नव्हते. यावेळी, त्यांचा एक पाय घरात  होता तर दुसरा पाय कोर्टात होता. त्यांना असह्य छळ सहन करावा लागला पण न्यायालयीन यंत्रणेवर त्यांचा विश्वास होता.

 न्याय जिंकला आहे. त्यांनी महिलांना निर्भयपणे आपल्या हक्कांसाठी लढायला हवे आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा असा संदेश दिला आहे. जुलूम करणार्‍यांविरुध्द संघर्ष करा आणि अत्याचारी लोकांना धडा शिकवा.

अतिया साबरी या तिहेरी तलाकविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढा देणार्या सहारनपूरच्या मोहल्ला अली येथील  रहिवासी आहेत.अतिया साबरीचे 25 मार्च 2012 रोजी हरिद्वार जिल्ह्यातील सुलतानपूर येथे राहणारे वाजिद अलीशी लग्न झाले होते.

How did this courage subside, how did this desire stop …! Saharanpur’s Atiya Sabri wins triple divorce case, gets alimony !

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात