मायानगरी मुंबईत यंदा घरविक्रीत प्रचंड वाढ, करोनाचे सावट झाले दूर

विशेष प्रतिनिधी

मुंबई – ‘एमएमआर हाऊसिंग रिपोर्ट २०२१’मधील निष्कर्षानुसार चार वर्षांच्या तुलनेत २०२१ वर्षाने घरविक्रीच्या बाबतीत सर्वोत्तम ठरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईमध्ये २०१७, २०१८ आणि २०१९ अशा तीन वर्षांच्या तुलनेत जानेवारी-ऑगस्ट २०२१ या कालावधीत घरविक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.House sale increased in Mumbai

या कालावधीतील विक्री २०१७ ते २०२० अशा चारही वर्षांमधील विक्रीपेक्षा जास्त आहे. दोन्ही भागांमधील ९० टक्के घरांच्या विक्रीची किंमत दोन कोटींहून अधिक होती.
जानेवारी-ऑगस्ट २०२१ कालावधीत पूर्व उपनगरांमध्ये विक्री झालेल्या घरांची संख्या, त्यांचे मूल्य आणि क्षेत्रफळाने पाच वर्षांतील या निकषांच्या आकड्यांना मागे टाकले आहे.त्याचप्रमाणे एक कोटीपेक्षा अधिक किंमत असलेल्या युनिटच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सुमारे ८० टक्के घरविक्री ही एक कोटीहून अधिक किंमत असलेल्या अपार्टमेंट्सची झाली आहे.

पश्चिम उपनगरे हे मुंबईचे सर्वात मोठे मॅक्रो-मार्केट असून जानेवारी-ऑगस्ट २०२१ या कालावधीतील विक्री २०१७ ते २०२० अशा चारही वर्षांच्या विक्रीपेक्षा जास्त आहे.

House sale increased in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या