लाईफ स्किल्स : नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवायला शिका


कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आजूबाजूच्या परिस्थितीचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. पण, अशा परिस्थितीतही स्वतःवर प्रेम करा. सकारात्मकतेनं आणि मेहनतीनं काम केल्यास कार्यक्षमताही वाढेल. शिवाय, डोक्यात नकारात्मक विचारही येणार नाहीत. वर्तमानकाळात जगायला शिका. भूतकाळात झालेल्या चुकांमुळे नव्या संधी स्वीकारताना न्यूनगंडाची भावना कायम असते अशी तक्रार करतात. पण यावरही मात करता येणं शक्य आहे. समोरून येणाऱ्या संधींना नव्या जोमानं आणि उत्साहानं स्वीकारा. असं केल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल असं तज्ज्ञ मंडळी आवर्जून नमूद करतात. Always learn to believe in yourself

मेंदूला चालना देण्यासाठी आणि स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी कायम नवीन गोष्टी शिकायला हव्यात असं तज्ज्ञ सांगतात. बौद्धिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी तुमच्या सवयींमध्ये बदल करायला हवा. तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून शक्य तितक्या लांब राहणं फायद्याचं ठरू शकतं. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वेळेचं उत्तम नियोजन करता यायला हवे. कारण वेळ वाया घालविला की कामाचा बोजा वाढत राहतो. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना सक्रिय राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी स्वतःला सदैव सक्रिय राहण्याचीही सवय लावायला हवी. मेंदूचा वेग वाढवण्यासाठी मानसिक आरोग्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. हाती घेतलेलं काम वेळेत आणि तंतोतंत पूर्ण होण्यासाठी उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. शिकण्यासाठी वयाची अट नसते.

नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याकडे कल वाढवायला हवा. दैनंदिन जीवनात इतर कामांसोबत वाचन करा. यासोबतच तुम्हाला आवडणाऱ्या कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून, तुमची सृजनशीलताही वाढेल. स्वतःला वेळ द्यायला शिका. बऱ्याचदा कामाच्या व्यापात स्वतःकडे दुर्लक्ष होतं. व्यग्र वेळापत्रकातही स्वतःसाठी वेळ राखून ठेवायला हवा. दररोजच्या कामामधून शरीराप्रमाणेच मेंदूलाही ब्रेक हवा असतो असतो. स्वतःला वेळ दिल्यानं बऱ्याच गोष्टी शिकण्यास मदत मिळते. त्यामुळे जगण्याचे पुनरावलोकन नेहमी करीत राहणे आवश्यक असते. दिवसेंदिवस तुम्ही काय नवं शिकत आहात याची नोंद करत राहा. सवयींमध्ये केलेल्या बदलांमुळे स्वतःमध्ये आलेले सकारात्मक बदल इतरांशी शेअर करा.

Always learn to believe in yourself

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात