मेक्सिकोमध्ये भीषण रस्ता अपघात, भरधाव वेगातील बस घराला धडकली, 19 जणांचा मृत्यू


मेक्सिकोमध्ये बसचा मोठा अपघात झाला आहे. यात किमान १९ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व शुक्रवारी धार्मिक स्थळाकडे जात होते. त्यानंतर बस घरावर आदळून दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मध्य मेक्सिकोमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व बळी पश्चिमेकडील मिचोआकन राज्यातील रहिवासी आहेत. हे लोक कॅथोलिक चर्चमध्ये जात होते. स्थानिक टेलिव्हिजनशी बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.” Horrific road accident in Mexico, speeding bus collided with home, 19 people died


वृत्तसंस्था

सेंट्रल मेक्सिको : मेक्सिकोमध्ये बसचा मोठा अपघात झाला आहे. यात किमान १९ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व शुक्रवारी धार्मिक स्थळाकडे जात होते. त्यानंतर बस घरावर आदळून दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मध्य मेक्सिकोमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व बळी पश्चिमेकडील मिचोआकन राज्यातील रहिवासी आहेत. हे लोक कॅथोलिक चर्चमध्ये जात होते. स्थानिक टेलिव्हिजनशी बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.”मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून धावणारी ही बस एका घरावर आदळल्याने हा अपघात झाला. इतर 32 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. जे त्यावेळी स्थानिक धार्मिक स्थळाच्या दिशेने जात होते. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघातामागील कारण अद्याप सांगितलेले नाही. स्थानिक मीडियाने दुर्घटनाग्रस्त बसचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Horrific road accident in Mexico, speeding bus collided with home, 19 people died

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था