विशेष प्रतिनिधी
लॉसएंजिल्स – जगप्रसिद्ध एमी पुरस्कार सात वेळा जिंकलेले एड एस्नर (वय ९१) यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. एस्नर यांच्या निधनाची माहिती त्यांनच्या कुटुंबाने ट्विटरद्वारे दिली.एस्नर यांनी १९७० व १९८० या काळात लोकप्रिय विनोदी टीव्ही मालिका ‘द मेरी टायलर मूरे शो’ आणि त्याची सुधारित आवृत्ती ‘लोऊ ग्रांट’ यात अभिनय केला होता.Hollywood star Esner passed away
एस्नर यांच्या वैविध्यपूर्ण कामांमध्ये २००९मध्येा प्रदर्शित झालेल्या ‘अप’ या ॲनिमेटेड चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला जातो. यातील कार्ल फ्रेडरिकसन या प्रमुख पात्राला त्यांनी आवाज दिला होता.एस्नर यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. वयाच्या नव्वदीपर्यंत ते काम करीत होते.
मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक वर्षे चरित्र अभिनेता म्हणून काम केले. सहाय्यक अभिनेत्यासाठी त्यांना तीन तर ‘रिच मॅन, पुअर मॅन’ आणि ‘रुट्स’ या दोन लघु मालिकांसाठी त्यां नी दोन एमी पुरस्कार त्यांना मिळाले होते. काही काळापूर्वी एस्नर यांनी ‘ग्रेस अँड फ्रँकी’, ‘कोब्रा काय’ आणि ‘अमेरिकन डॅड’ या मालिकांसाठी आवाज दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App