भारताकडून व्हिएतनामला प्राणवायू, कोरोनाविरुध्द लढण्यासाठी १०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: व्हिएतनाम या देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने व्हिएतनामला मदतीचा हात पुढे केला असून १०० मेट्रीक टन ऑक्सिजन आणि ३०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पुरविले आहेत.India supplies 100 metric tonnes of oxygen to Vietnam to fight corona

दक्षिणपूर्व अशियातील देश असलेल्या व्हिएतनाममध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस ऐरावत ऑक्सिजन घेऊन व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी बंदरावर पोहोचले, असे भारतीय नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत सरकारच्या सागर क्षेत्रातील सुरक्षा मोहीमेचा एक भाग म्हणून ही मदत पोहोचविण्यात आलीआहे.



कोरोना महामारीच्या पहिल्या टप्यापासून भारतीय नौदल जहाजांद्वारे इतर देशांना मदत पोहोचवित आहेत. कोरोनामुळे अडकलेल्या भारतीयांना घरी पोहचवण्याच्या तसेच शेजारील देशांना अन्न आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्याच्या मोहिमाही आखल्या जात आहेत.

त्याचबरोबर भारतामध्येही एप्रिल-मे महिन्यात कोरोनाची दुसरी प्राणघातक लाट देशात आली तेव्हा भारतीय नौदल जहाजांनी भारताच्या शेजारील देशांमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.भारत-व्हिएतनाम संबंधांचा संदर्भ देत भारतीय नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि व्हिएतनाम मैत्रीचे मजबूत बंध आहेत. सुरक्षित सागरी क्षेत्रासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.

India supplies 100 metric tonnes of oxygen to Vietnam to fight corona

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात