विशेष प्रतिनिधी
डेहराडून : टोकियो आॅलिम्पिकमध्ये वाघीणीसारखी झुंज देणाऱ्या हॉकीपटू वंदना कटारिया हिची उत्तराखंड सरकारने महिला आणि बालकल्याण विभागाच्या ब्रॅँड अॅँम्बॅसिटर म्हणून नियुक्ती केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वंदनाचे अभिनंदन केले.Hockey player Vandana Kataria to be honored by Uttarakhand Government, Brand Ambassador of Women Empowerment and Child Welfare
त्यांनी वंदना यांना त्यांच्या डेहराडून येथील शासकीय निवासस्थानी आमंत्रित केले. उत्तराखंड सरकारचा प्रतिष्ठेचा टिलू राउतेली पुरस्कार देण्याची घोषणा केली.धामी म्हणाले, आपले सरकार क्रीडा विभागासाठी नवीन धोरण तयार करत आहे. राज्यातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन प्रतिभेला जोपासण्यावर भर दिला जाईल.
उत्तराखंड सरकारने यापूर्वीच वंदनाला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आता बॅँड अॅँम्बॅसिटर बनवून सन्मान केला आहे.पुरुष आणि महिला हॉकी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्याने भारताने टोकियोमध्ये इतिहास रचला. पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कांस्यपदक जिंकले. महिला संघाने प्रथमच उपांत्य फेरी खेळली.
कांस्यपदकाच्या लढतीत भारताने २०१६ च्या रिओ सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनविरुद्ध निकराने लढा दिला. एका टप्प्यावर सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली होती. तथापि, ग्रेट ब्रिटनने शेवटी ४-३ ने विजय मिळवून भारताच्या विजयाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. महिला हॉकी संघ पराभूत झाला असला तरी त्यांनी जगभरातील लाखो चाहत्यांची मने जिंकली.
वंदना कटारिया उत्तराखंडमधील रोशनबाद येथील रहिवासी आहे. उपांत्यपूर्व सामन्यात वंदनाने हॅटट्रिक केली होती. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत धडक मारता आली होती. मात्र, उपांत्य फेरीत अर्जेंटिना संघाकडून भारताला २-१ अशी मात स्वीकारावी लागली. त्यानंतर वंदनाच्या घरावर कथितरित्या दगडफेक झाली होती. पोलीसांनी याप्रकरणी तीन जणांना अटकही केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App