वृत्तसंस्था
आग्रा : ऐतिहासिक ताजमहाल अतिक्रमण मुक्त होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने ताजमहालच्या परिसरातील 500 मीटर सीमेअंतर्गत व्यवसाय बंदी करायला करायचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आग्रा जिल्हा मॅजेस्टेट करणार आहेत. Historic Taj Mahal will be encroachment free
ताजमहल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. अस्वच्छता आहे. प्रत्यक्ष ताजमहालाकडे जाण्याच्या रस्त्यावर अनेकांनी आपल्या व्यवसायाचे बस्तान बसवले आहे. त्यामुळे पर्यटकांना वाहतुकीत मोठे अडथळे उत्पन्न होतात. अनेक ठिकाणी अवैध धंदे चालतात. या अतिक्रमणाविरोधात आग्रा नागरिक कृती समिती कोर्टात गेली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत.
आग्रा जिल्हा मॅजिस्ट्रेटने संबंधित व्यावसायिकांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. या व्यवसायिकांनी येत्या तीन महिन्यांमध्ये स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत. अन्यथा प्रशासन उचित कारवाई करेल, असा इशारा आग्र्याचे जिल्हा मॅजिस्ट्रेट नवनीत सिंह चहल यांनी दिला आहे. या दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्ट जे निर्देश देईल त्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल, असे चहल यांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळीनंतर पुढील काही महिने हा पर्यटनाचा मोसम असतो. या पार्श्वभूमीवर आग्र्यातील अतिक्रमण हटवण्याला प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App