हिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार


बांग्ला देशात हिंसाचार माजवणारा हिफाज ए इस्लाम या कडव्या संघटनेचा नेता ममूनूल हक याला अटक करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्ला देश दोऱ्याच्या वेळी हक याच्या चिथावणीवरून हिंसाचार झाला होता.Hifazat-e-Islam leader arrested in Bangladesh, Prime Minister Narendra Modi’s visit was marred by violence


विशेष प्रतिनिधी

ढाका : बांग्ला देशात हिंसाचार माजवणारा हिफाज ए इस्लाम या कडव्या संघटनेचा नेता ममूनूल हक याला अटक करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्ला देश दोऱ्याच्या वेळी हक याच्या चिथावणीवरून हिंसाचार झाला होता.

हिफाजत ए इस्लाम या संघटनेचा सहसचिव असलेल्या हक याला पोलीसांनी ढाका येथे एका मदरशातून अटक केली. हक याचा कट्टरतावादी मुस्लिमांवर मोठा प्रभाव आहे. इस्लामवर टीका करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्याच्या संघटनेने केली आहे.४७ वर्षांचा हक हा हिफाजत ए इस्लाम या संघटनेचाप्रभावी नेताआहे. त्याने बांग्ला देशातील मदरशांमध्ये आपल्या संघटनेचे जाळे विणले आहे. ही संघटना राजकीय पक्ष नसला तरी देशात मुस्लिम बहुसंख्य असल्याने इस्लामीक कायद्यांचा स्वीकार व्हावा अशी त्यांची मागणी आहे.

त्यामुळे बांग्ला देशाच्या घटनेला आणि कायदा व्यवस्थेला ही संघटना मानत नाही. ब्रिटीश कायद्यावर ही घटना आधारित आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.

Hifazat-e-Islam leader arrested in Bangladesh, Prime Minister Narendra Modi’s visit was marred by violence

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण