वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पचा तब्बल 1000 कोटींचा बोगस व्यवहार उघडकीस आला आहे. यामध्ये 100 कोटींच्या कॅश ट्रांजेक्शनचा देखील समावेश आहे. Hero Motocorp IT Raids 100 crore cash transaction
23 मार्च रोजी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर आणि अन्य 49 ठिकाणांवर एकाच वेळी छापे घातले होते. कंपनीचे व्यवहार तपासल्यानंतर यातली जी प्रचंड रक्कम पुढे आली पुणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी देखील चक्रावले आहेत.
हिरो मोटोकॉर्प कंपनीने बोगस खरेदी व्यवहार, बोगस खर्च तसेच अन्य कॅश ट्रांजेक्शन यातून तब्बल 1000 कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर छत्तरपुर येथे फार्म हाऊस खरेदी करण्यासाठी 100 कोटी रुपयांचे कॅश ट्रांजेक्शन करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. दिल्लीतील छत्तरपुर परिसरात जमिनीचे बाजार भाव अधिक असताना फक्त टॅक्स वाचवण्यासाठी कमी भाव दाखवून 100 कोटी रुपयांचे ट्रांजेक्शन कॅश मध्ये करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अनेक बड्या कंपन्यांवर कारवाया केल्या आहेत. परंतु हिरो मोटोकॉर्प सारख्या देशभरात नावाजलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असलेल्या कंपनीतून बोगस खरेदी आणि बोगस खर्च यांचा तब्बल 1000 कोटी रुपयांचा व्यवहार प्रथमच उघडकीस आला आहे.
– बडे मासे गळाला लागण्याची शक्यता
या संदर्भात पुढची कायदेशीर कारवाई सुरू असून लवकरच या प्रकरणी अनेक कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच पवन मुंजाल यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यांना अटकही होऊ शकते, असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
छत्तरपूर फार्म हाऊस खरेदी
छत्तरपूर येथील फार्म हाऊस खरेदी करताना हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या अकाउंट मधून तब्बल 100 कोटी रुपयांची कॅश देण्यात आल्याचे कागदपत्रांतून तसेच डिजिटल पुराव्यांवरून उघड झाले आहे. कंपनीने अनेक ठिकाणी बोगस खरेदी तसेच बोगस खर्च दाखवल्याचे ही कागदपत्रांमधून आणि अन्य डिजिटल पुराव्यांवरून समोर आले आहे, असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट च्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. ही बातमी वृत्तसंस्थेने ट्विट केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App