देशात बौध्दीक दहशतवाद, डाव्या विचारांचा प्रभाव असल्याने माध्यमांध्येच नाही लोकशाही, हेमंत बिस्वा सरमा यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी: डाव्या विचारांचा माध्यमांवर प्रभाव असल्याने देशात आजपर्यंत बौध्दीक दहशतवाद माजला होता. इतरांच्या मतांना स्थान दिले जात नाही. माध्यमांमध्ये मार्क्स आणि लेनिन यांना जागा मिळते परंतु भारतीय संस्कृतीला जागा दिली जात नाही असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले आहे.Hemant Biswa Sarma’s allegation that democracy is not in the media due to the influence of intellectual terrorism and leftist ideology in the country.

धर्मनिरपेक्षतेचे तत्व भारतीय संस्कृतिच्या संदर्भात नव्याने परिभाषित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून सरमा म्हणाले, डाव्या विचारांच्या बुध्दीजीवींचे, तथाकथित उदारमतवाद्यांचे माध्यमांवर वर्चस्व आहे. देशातील बुधीवंतांमध्ये अद्यापही डाव्या विचारांचे प्राबल्य आहे.



त्यामुळे माध्यमांमध्ये पर्यायी मतांना स्थान दिले जात नाही. विरोधी मते दाबून टाकली जातात. देशात बौध्दीक दहशतवाद पसरविला गेला आहे. भारतातील डावे हे कार्ल मार्क्सपेक्षाही जास्त कडवे डावे आहे.

माध्यमांमध्ये कोणत्याही प्रकारची लोकशाही सरमा म्हणाले, माध्यमांतील लोक खासगी संभाषणात इतरांची मते ऐकून घेतात; परंतु डाव्या विचारांच्या लोकांना जास्त स्थान देतात. भारतातील अनेक लोक धर्मनिरपेक्षतेचे तत्व भारतीय संस्कृतीच्या अंगाने परिभाषित करावे अशा मताचे आहेत.

याचे कारण म्हणजे ऋग्वेद काळापासून भारत हा धर्मनिरपेक्ष देश राहिलेला आहे. कारण आम्हीच जगाला धर्मनिरपेक्षता आणि मानवता या तत्वांची देणगी दिली आहे. आमची संस्कृती पाच हजार वर्षे पुरतान आहे. आम्ही युगोनयुगे विचार, धर्म आणि संस्कृतीतील विविधतेचा स्वीकार केला आहे.

नागरिकत्व संशोधन कायद्यावर बोलताना सरमा म्हणाले, आसामच्या बाहेर चाललेल्या आंदोलनात केवळ हिंदूंनाच नागरिकता का दिली जात आहे असा प्रश्न विचारला जात आहे. मुस्लिमांनाही ही सुविधा मिळावी असे म्हटले जात आहे. मात्र, आसाममध्ये हिंदू किंवा मुस्लिम या दोघांनाही नागरिकता देण्यास विरोध केला जात आहे.

मात्र, तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकता संशोधन कायदा हा त्या लोकांसाठी आहे ज्यांनी फाळणीचे दु:ख भोगले आहे. धर्माच्या आधारावर बनलेल्या लोकांसाठी हा कायदा नाही

Hemant Biswa Sarma’s allegation that democracy is not in the media due to the influence of intellectual terrorism and leftist ideology in the country.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात