विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – राजस्थानच्या कोटा विभागात २५ नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ वर पोचली आहे.Heavy rain in MP and Rajsthan
मध्य प्रदेशच्या उत्तर भागात या आठवड्याच्या सुरवातीला पुराची स्थिती भयंकर झाली होती. सुमारे १२५० हून अधिक खेडी मुसळधार पावसाने पाण्यात गेली. ग्वाल्हेर, शिवपुरी, श्योरपूर, दतिया, अशोक नगर, गुना, भिंड आणि मोरेना जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
ग्वाल्हेर विभागातील अशोक नगर आणि गुना जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात अनुक्रमे ३२ मिलीमीटर आणि १६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजस्थानमध्ये पावसाचा कहर असून बारां आणि कोटा येथे अनेक ठिकाणी सुमारे पाचशे हून अधिक नागरिक अडकले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. बारां जवळील पण मध्य प्रदेशात असलेल्या गुना जिल्ह्यातील पार्वती नदीलगतच्या सोडा गावात सुमारे ३०० हून अधिक नागरिक अडकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App