हरियाणाचे मुख्यमंत्री बदलले जाणार? खट्टर यांच्यानंतर कोण बनणार हरियाणाचे मुख्यमंत्री?


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आजवर तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री भाजपाने काही महिन्याच्या आतच बदलले होते. आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलले जाण्याची शक्यता आहे. काही भाजप नेत्यांनी दिलेल्या संकेतावरून हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवण्यात येणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Hariyana chief minister may have to step down

शेतकरी आंदोलनावर खट्टर यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकऱ्याना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची भाषा खट्टर यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतेय. कार्यकर्ते उभे करा जशास तसं उत्तर द्या  आज भडकवणारे विधान खट्टर यांनी नुकताच केले होते.


राज्यसभेच्या सहा जागांसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त जागेचीही निवडणूक


त्यानंतर त्यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्नही केला होता. पण शेतकरी आंदोलन, लखीमपूर हिंसाचार यावरून वातावरण तापलेले असताना खट्टर यांचं विधान आगीत तेल ओतणारे ठरले आहे. भाजप आमदार वीरेंद्र गुज्जर यांनी तसे स्पष्ट संकेत देताना म्हटले आहे की, खट्टर यांना आठवड्याभरात किंवा 10 दिवसांत हटवले जाईल. खट्टर यांच्या नंतर हरियाणाचे मुख्य मंत्री कोण होणार ह्याची चर्चा मात्र बरीच रंगली आहे.

Hariyana chief minister may have to step down

 

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”