Happy Birthday President : राष्ट्रपती कोविंद यांचा जन्मदिन, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही केली वकिली, यूपीतून या पदावर पोहोचणारे पहिले

Happy Birthday President Ram Nath Kovind Profile And His Political Journey

President Ram Nath Kovind Profile : आज देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा वाढदिवस आहे. दलित समुदायातून आलेल्या रामनाथ कोविंद यांचा जन्म 1945 साली कानपूरच्या ग्रामीण भागातील परौख या छोट्या गावात झाला. रामनाथ कोविंद राष्ट्रपती होण्यापूर्वी बिहारचे राज्यपाल होते. सर्वात मोठी बाब म्हणजे रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातून आलेले पहिले राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची येथे माहिती देत आहोत. Happy Birthday President Ram Nath Kovind Profile And His Political Journey


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा वाढदिवस आहे. दलित समुदायातून आलेल्या रामनाथ कोविंद यांचा जन्म 1945 साली कानपूरच्या ग्रामीण भागातील परौख या छोट्या गावात झाला. रामनाथ कोविंद राष्ट्रपती होण्यापूर्वी बिहारचे राज्यपाल होते. सर्वात मोठी बाब म्हणजे रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातून आलेले पहिले राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची येथे माहिती देत आहोत.

कोविंद भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तेही होते

भाजप दलित मोर्चा आणि अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष असलेले कोविंद यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी काळातील रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील भाजपचा सर्वात मोठा दलित चेहरा मानले जात होते.

राजकीय प्रवास

रामनाथ कोविंद यांनी 1990 मध्ये भाजपमध्ये सामील होऊन लोकसभा निवडणूक लढवली. ते निवडणूक हरले, पण 1993 आणि 1999 मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. यादरम्यान, रामनाथ कोविंद हे भाजप अनुसूचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले. 2007 मध्ये रामनाथ बोगनीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले, पण पुन्हा जिंकू शकले नाहीत. यानंतर, ते यूपी भाजप संघटनेत सक्रिय होऊन त्यांना राज्याचे सरचिटणीस बनवण्यात आले.

राज्यसभा सदस्य म्हणून कोविंद यांनी अनेक संसदीय समित्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. विशेषतः ते अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समिती, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण आणि विधी व न्यायसंबंधी संसदीय समितीचे सदस्य होते.

दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली

एलएलबीचा अभ्यास केल्यानंतर रामनाथ कोविंद यांनी आयएएसची तयारी केली होती. त्यांनी नागरी सेवा परीक्षादेखील उत्तीर्ण केली, परंतु आयएएस संवर्ग नसल्यामुळे त्यांनी कायद्याची प्रॅक्टीस करण्याचा निर्णय घेतला. रामनाथ कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. 1977 ते 1979 पर्यंत ते दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील होते. 1980 ते 1993 पर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.

नेहमी गरीब आणि दीनदुबळ्यांची मदत केली

वकील म्हणून कोविंद यांनी नेहमी गरीब आणि दीनदुबळ्यांना मदत केली. विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, गरजू आणि गरिबांना त्यांनी फ्री लीगल एड सोसायटीच्या बॅनरखाली मदत केली. ऑक्टोबर 2002 मध्ये कोविंद यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले होते.

रामनाथ कोविंद भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनऊच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाताच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्यही राहिले आहेत. कोविंद यांनी संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. ऑक्टोबर 2002 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले.

वेळोवेळी उत्तर प्रदेशला भेट देतात

साध्या आणि सरळ स्वभावाचे राष्ट्रपती कोविंद यांचे कानपूरशी जिव्हाळ्याचे नाते आहे. ते राष्ट्रपती असले तरी कानपूरशी त्यांचा सतत संबंध आहे. यामुळेच ते वेळोवेळी उत्तर प्रदेशला भेट देत आले आहेत. अलीकडेच ते ट्रेनने आपल्या गावी गेले होते.

Happy Birthday President Ram Nath Kovind Profile And His Political Journey

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात