प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती महंमद हमीद अन्सारी यांची मोदी राजवटीविषयीची भूमिका सर्वश्रूत आहे. पण त्यांची ही मोदी विरोधी भूमिका का झाली??, त्याचे धागेदोरे – तारा नेमक्या कुठे जोडले गेले आहेत? त्यामागचे रहस्य काय? याचा खुलासा दस्तूर खुद्द हमीद अन्सारी यांनी केलेला नाही. पण त्यांनी भारतात वारंवार निमंत्रित केलेल्या एका पाकिस्तानी पत्रकाराने धक्कादायक खुलासे केले आहेत.Hamid Ansari given patronage to ISI agent of Pakistan noosrat mirza in India
पाकिस्तानातील नुसरत मिर्झा या पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने 5 वेळा भारतात आल्याची 7 शहरे फिरून माहिती घेऊन ती आयएसआयला पुरवल्याची कबुली दिली आहे. नुसरत मिर्झा हाच तो पत्रकार आहे, ज्याला काँग्रेस प्रणित यूपीए 2 च्या काळात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी दहशतवादावरील एका परिसंवादासाठी आमंत्रित केले होते. त्यानेच भारतात फिरून आयएसआयच्या एजंटच्या रूपाने पाकिस्तानला माहिती दिली होती.
नुसरत मिर्झा हा आयएसआय एजंट जरी स्वतःला पत्रकार म्हणवतो. व्यवसायाने तो इस्लामाबाद येथे इंजिनियर आहे. नुसरत 2005 ते 2011 दरम्यान 5 वेळा भारताला आला होता. 2010 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्याला भारतात दहशतवादावरील परिसंवादासाठी आमंत्रित केले होते, ज्यामध्ये नुसरत हा प्रमुख पाहुणा होता. यानंतर 2011 मध्ये मिल्ली गॅझेटचे संस्थापक आणि संपादक जफरुल इस्लाम याला बोलावले होते.
नुसरत मिर्झाची कबुली
या व्हायरल व्हिडिओमध्ये नुसरत मिर्झा म्हणतो की, तुम्ही आणलेली माहिती जनरल अशफाक कियानी (आयएसआयचे महासंचालक) यांना द्या, मी म्हणालो, मी तुम्हाला देणार नाही, मग आयएसआय ब्रिगेडियरचा फोन आला. अशी आणखी माहिती उपलब्ध असल्यास बरे होईल. माझ्याकडील माहिती पुरेशी नसली तरी जेवढी आहे त्यावरून काम करा. आयएसआयला तिथली परिस्थिती माहीत आहे. त्यांना तिथल्या सर्व शहरांची माहिती आहे. त्यांची जीवनशैली कशी आहे? त्यांचे कमकुवत मुद्दे काय आहेत? आमच्या आयएसआयला हे सर्व माहीत आहे. मी भारतात गेलो, चंदिगडमध्ये दहा दिवसांसाठी, त्यानंतर हैदराबाद डेक्कन बंगळुर तसेच २००६मध्ये चेन्नई येथे गेलो.
This tweet has gone viral in India and the truth bombs dropped by Nusrat Mirza during the interview are picking up steam by the day. So I thought it will be good to have Shakil Chaudhary (the host) on a twitter space hosted by yours truly. So see you, I mean hear you at 6 PM. https://t.co/uu9Sr6QcoK — Sonam Mahajan (@AsYouNotWish) July 12, 2022
This tweet has gone viral in India and the truth bombs dropped by Nusrat Mirza during the interview are picking up steam by the day. So I thought it will be good to have Shakil Chaudhary (the host) on a twitter space hosted by yours truly.
So see you, I mean hear you at 6 PM. https://t.co/uu9Sr6QcoK
— Sonam Mahajan (@AsYouNotWish) July 12, 2022
यानंतर महिनाभरासाठी कोलकाता येथे गेलो. पाटणा, लखनऊ येथेही गेलो. त्या वेळी माझ्याकडे अलाहाबादचा व्हिसाही होता. तेव्हा कसुरी साहेब परराष्ट्र मंत्री होते. (खुर्शीद महमूद कसुरी – 2002 ते 2007 पर्यंत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री), त्यांनी मला सात शहरांचा व्हिसा दिला होता. भारतातील लोक तीन शहरांसाठी व्हिसा देतात, त्यांनी मला सात शहरांसाठी व्हिसा मिळवून दिला. पण मी अलाहाबादला जाऊ शकलो नाही, तिथे कर्फ्यू होता. तिथले उर्दू वृत्तपत्रांचे सर्व संपादक माझे मित्र आहेत, जे टीव्ही चॅनेल्स आहेत, जेव्हा मी जायचो तेव्हा 10 – 20 वृत्तवाहिन्यांना मुलाखती द्यायचो. 2010 मध्ये मला पुन्हा बोलावण्यात आले, त्यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मला निमंत्रित केले होते. दहशतवादावरील चर्चासत्रासाठी हे निमंत्रण दिले होते.
– काँग्रेसची नेहमीची सारवासारव
नवभारत टाइम्सने काँग्रेस पक्षाचे नेते उदित राज यांना नुसरत मिर्झाच्या कबुली जबाबावर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे सांगितले. संपूर्ण शहरात जाऊन फिरा, लाखो लोकांचे विवाह होत असतात. मुझफ्फर नगरमध्येही लग्ने होतात. लोक येत-जात असतात. एक नाही तर हजारो लोक येत-जातात. तुम्ही कोणताही अर्थ नसताना प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य वाटले.
– हमीद अन्सारींना असहिष्णुतेचा “साक्षात्कार”
हमीद अन्सारी हे यूपीए सरकारच्या काळात 2007 ते 2017 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते. 1961 मध्ये त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली आणि त्यांनी चार दशके ते कार्यरत होते. 90 च्या दशकात त्यांना संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी बनवण्यात आले. ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षही होते. हमीद अन्सारी हे त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम अडचणीत सापडायचे. उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना मोदी सरकारचा राजवटीत भारतातल्या असहिष्णुतेचा साक्षात्कार झाला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App