वृत्तसंस्था
काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरात असलेल्या ज्ञानव्यापी मशीद आणि तिच्या परिसरात असलेल्या शृंगार गौरी मंदिराचे व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षण सध्या न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या सर्वेक्षणाचा मुस्लिम पक्षाने विरोध केला आहे. दुपारी 3.00 वाजल्यापासून 6.00 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण होत आहे. त्याचा रिपोर्ट हायकोर्टाला सादर केला जाईल आणि त्यानंतर शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजन करायला परवानगी द्यायची का नाही याचा निर्णय देणार आहे. Gyanvapi Masjid – Videography Survey of Shringar Gauri Temple Premises
ज्ञानव्यापी मशीद परिसरामधील या मंदिर समूहांमध्ये शृंगार देवी मंदिर आहे. ते सध्या फक्त नवरात्रातल्या चतुर्थीला उघडून पूजाअर्चा केली जाते. मात्र काही महिलांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली असून शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजा अर्चना करण्याची परवानगी मागितली आहे. ज्ञानव्यापी मशीद ट्रस्ट याला विरोध आहे. असे कोणतेही स्वतंत्र शृंगार गौरी मंदिर अस्तित्वात नाही, असा मुस्लीम पक्षाचा दावा आहे.
यासंदर्भात हायकोर्टाने नेमलेली समिती सध्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करीत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यावर त्यावर आधारित निर्णय घेणे अपेक्षित आहे.
आज सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर ज्ञानवापी मस्जिद परिसर येथे बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा ठेवला आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या 4 नंबर गेट पासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. तेथेच एका महिलेने नमाज पठण केले तिला पोलिसांनी ताबडतोब बाजूला केले असून त्याच वेळी हर हर महादेव आणि अल्लाहू अकबर ची घोषणाबाजी झाली आहे.
गेट नंबर 4 वर नमाजपठण करणारी महिला मानसिकदृष्टया असंतुलीत आहे. तिच्या पतीने तिला सोडून दिले आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 7 मुले असल्याचे तिने नंतर पोलिसांना सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App