विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार व्हायलाच हवेत. रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसले तरीसुद्धा त्यांच्यावर उपचार करा असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.Gujrat high court orders govt for covid treatment
सध्या गुजरातच्या अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून परिस्थीती वेगाने हाताबाहेर जावू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्या नागरिक बेहाल झाले आहेत.
मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्या. भार्गव करिया यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजन तयार करता यावा म्हणून अन्य पर्याय शोधण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान गुजरातमधील कोरोनाच्या संसर्गाची भीषण स्थिती लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने स्वतःहून याबाबत सुनावणी घ्यायला सुरुवात केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App